वर्धा ब्रेकिंग : वर्ध्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला #corona positive in wardha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वर्धा ब्रेकिंग : वर्ध्यात पहिला कोरोना रुग्ण सापडला #corona positive in wardha

Share This
खबरकट्टा / वर्धा : 

आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रवेश झाला आहे. आर्वी तालुक्‍यातील एका महिलेचा अहवाल पोझेटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा दोन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. महिलेचा अहवाल रविवारी आज प्राप्त झाल्याने या बाबीचा खुलासा झाला. 

यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ माजली आहे. आर्वी तालुक्‍यातील हिवरा तांडा या गावातील महिलेला त्रास असल्याने सावंगी येथील रुग्णालयात तापसणीसाठी पाठविण्यात आले होते. यावेळी तिच्या गळ्याचा स्त्राव तापसनीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेला वर्धा जिल्हा कोरोना प्रादुर्भाव असलेला झाला आहे.