दिलासादायक : चंद्रपुरातील कोरोना बाधित युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल नेगेटिव्ह #corona-negative - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दिलासादायक : चंद्रपुरातील कोरोना बाधित युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल नेगेटिव्ह #corona-negative

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

काल यवतमाळमधून चंद्रपूरला आलेल्या पॉझिटिव्ह युवतीच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल आज निगेटिव्ह आले आहेत . आज दुपारी हा अहवाल प्राप्त झाल्याने चंद्रपुरकरांना दिलासा मिळाला आहे. 

9 मे रोजी ही कोरोनाबाधित युवती यवतमाळ जिल्ह्यातून आपल्या आईला घेऊन चंद्रपूर येथे आली होती. 11 मे रोजी तिची चाचणी केली असता काल 13 मे रोजी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर शहरात जी बाजारपेठ उघडण्याची मुभा देण्यात आली होती.


ती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी मागे घेतली. या युवतीच्या आई-वडील आणि काका-काकू यांच्या घशातील स्रावाचे नमुने काल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ज्याचा अहवाल आज निगेटिव्ह आला. 

ही युवती आईच्या उपचारासाठी यवतमाळ येथे 9 एप्रिलाला गेली होती. जवळपास एक महिन्याने ती परतली होती. त्यामुळे हा संसर्ग इतक्यातच झाला असल्याची शक्यता आहे. कोरोनाबाधित युवतीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे.