लॉकडॉऊन काळात "तेंदुपत्ता संकलन " मजुरांसाठी वरदान #collecting-tendu-is-supporting-employment-at-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लॉकडॉऊन काळात "तेंदुपत्ता संकलन " मजुरांसाठी वरदान #collecting-tendu-is-supporting-employment-at-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :बल्लारपूर -

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे अश्यात भारतातही दररोजची रुग्णांची वाढती संख्या लाक्षत घेऊन चौथ्या लॉकडाऊन ची घोषणा झाली. मागील सतत दोन महिन्यापासून देशातील अनेक व्यवहार, व्यवसाय ठप्प आहेत. अनेक मजुरांच्या हातचे काम गेले, त्यांची मायदेशी परतण्याची धडपड आपण एरव्ही दररोज बघतोय. 

अश्यातच अनेक मजूर इतर राज्यातून जा-ये करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील हातावर आणून पानावर खाणाऱ्या मजुरांना इतर सर्व कामे ठप्प असल्याने तेंदूपत्ता संकलन आधार देणारे ठरले आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील खालील गावात लॉकडॉऊन काळात मजुरांना रोजगारासाठी तेंदुपाने संकलन करणे वरदान ठरले असुन सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करुन 1) कळमणा 2) बामणी 3) दहेली 4) केम 5) कोर्टी 6) लावारी 7) कवडजई 8) उमरी 9) सातारा भोसले 10) सातारा कोमटी इत्यादी गावात तेंदुपाने संकलन सुरु करण्यात आले असुन प्रति शेकडा तेंदुपुड्या करीता 220 रुपये मंजुर असुन गावकरी स्वखुषीने तेंदुपाने संकलन करीत आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13.02.2020 पासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदिनुसार  व मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधिक्षक यांनी वेळोवेळी दिलेल्या अटीशर्ती व आदेशानुसार सर्व तेंदुपता मजुरांनी नियमांचे पालन करुन आपली मजुरी मिळवावी परंतु कायद्याचे कोनतेही उल्लंघन करु नये. आपण स्वत: सुरक्षित राहुन आपल्या कुटुंबासह आपल्या गावाला, आपल्या देशाला सुरक्षित ठेवु याकरिता बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी अधिसुचना निर्गमित करून त्याबाबत पुढीलप्रमाणे नियमावली तयार करण्यात आलेली आहे.

1) केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर, मा. पोलिस अधिक्षक चंद्रपुर, आरोग्य विभाग तसेच वन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.

2) दर 20 मिनिटाला आपले हातपाय साबणाने किंवा जंतुनाशकांने स्वच्छ धुवावे.

3) शिंकताना किंवा खोकलतांना तोंडावर रुमाल, मास्क किंवा स्वच्छ कापडाचा वापर करावा.

4) दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी 2 मीटर अंतर ठेवावे.

5) फळीवर उभे राहतांना किंवा बसतांना सुरक्षित अंतर ठेवावे आणि फळीवर गर्दी करु नये.

6) जंगलात, फळीवर जाताना किंवा इतर ठिकाणी फिरतांना नेहमी तोंडाल रुमाल, मास्क बांधुनच जावे.एकमेकांसोबत हस्तांदोलन करुन नये.

7) वारंवार नाकाला व तोंडाला हात लावु नये, सार्वजनिक ठिकाणी, खुल्या जागेवर थुक नये.

8) फळीवर आल्यावर व फळीवरुन घरी गेल्यानंतर साबणाने किंवा जंतुनाशकाने हात स्वच्छ धुवावे.

9) आजारी व्यक्तीची माहिती किंवा आजाराबाबतची माहिती आपल्या गावातील सरपंच, पोलिस पाटील यांना त्वरीत द्यावी.

10) तैंदुपाने गोळा करण्याकरीता सुर्योदयानंतर जंगलसत समूहाने जावे एकटे जावु नये.

11) जंगल हे तेथील प्राण्यांचे घर असल्यामुळे जंगली प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या भागात एकटे जावू नये.

12) जंगलात तेंदु पाने गोळा करतांना कोणत्याही कोणत्याही झाडाची अवैध तोड करु नये.

वरील नियमावलीचे काटेकोर पालन करीत संपूर्ण देशात रोजगार बंद असताना महाराष्ट्र वनविभागाच्या माध्यमातून स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध झाला असून, टाळेबंदी च्या संकटकाळात स्थानिकांना आर्थिक लाभ मिळवून देण्यास आम्ही तत्पर आहोत तरीही वन विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. - संतोष थिपे, बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर.