जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कृषीपंपांचे लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यात यावे :- राजु झोडे #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कृषीपंपांचे लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्यात यावे :- राजु झोडे #chandrapur

Share This
- जिल्हाधिकारी यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री व मा.ऊर्जामंत्री यांना निवेदन देऊन केली मागणी

खबरकट्टा / चंद्रपूर : 
      
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना चे मोठे थैमान माजलेले असून सर्वसामान्य जनतेचे, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, कामगार व मजुरांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल होताना दिसत आहे. 

सर्वांचे छोटे-मोठे उद्योग काम-धंदे बंद पडलेले आहेत. मार्च महिन्यापासूनच  लाॅकडाऊन असल्याने कोणताही रोजगार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक चणचण निर्माण झालेली आहे. अशा आर्थिक विवंचनेत सापडलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्यांना वीज बिल भरायला सुद्धा पैसे नाही आहेत. 

त्यामुळे शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन जिल्ह्यातील लाकडावून काळातील घरगुती विज बिल तसेच शेतकरी व कृषी पंपाचे विजबिल माफ करावे. कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात शासनाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे वीजबिल माफ करून सहकार्य करावे.अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेमार्फत मा.मुख्यमंत्री व मा.ऊर्जामंत्री, महाराष्ट्र शासन यांच्याकडे निवेदनाच्या मार्फत केलेली आहे.