ब्रम्हपुरी ठाणेदार मकेश्वर यांना वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नात आहे काय?जिल्हा पोलीस प्रशासनाने केला वैद्यकीय कारण पुढे #bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रम्हपुरी ठाणेदार मकेश्वर यांना वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नात आहे काय?जिल्हा पोलीस प्रशासनाने केला वैद्यकीय कारण पुढे #bramhpuri

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी -

ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन चे वादग्रस्त ठाणेदार प्रमोद मक्केश्वर यांनी दोन दिवसांपूर्वी एका लकवा ग्रस्त व्यक्ती ला अमानुष मारहाण केली. त्या अन्यायाच्या विरोधात जांभुळे नामक व्यक्तीने वरीष्ठाकडे तक्रार दाखल केली. तसेच काही दिवसापूर्वी ब्रम्हनगरी वर्तमान पत्राचे संपादक शाम कंरबे यांच्या वर जीवघेणा हल्ला झाला. 

आरोपी ने स्वतःता वाहन जमा केले अशी माहिती आहे. तर आरोपीला अटक का बरं केले नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अभय देण्याचा गोरख धंदा सुरू केल्याचे समजले जात आहे. या लॉकडॉऊन काळात त्यांनी अनेक वयोवृद्ध व्यक्तींना मारहाण केली पण भीती पोटी नागरिक समोर आले नाही. हे तेवढेच खरे आहे. पण काही दिवसांपूर्वी एका पत्रकारांनी किराणा दुकानात सुगंधीत तंबाखू ची बेभाव व्रिक्री असे वृत्त प्रकाशित केले तर त्यांना ठाण्यात बोलावून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. 

अनेक पीडित नागरिक पोलीस स्टेशन ला आले असता त्यांना शिवराळ भाषा वापरून जर कोणी नाही ऐकल तर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरू होते. सामान्य जनतेचे रक्षक तर भक्षकांची भुमिका आत्मसात करत असतील तर पोलीस खात्याला कलंकित करणार्‍या अशा अधिकारी कायद्या पेक्षा मोठे झाले का असा प्रश्न निर्माण होत आहे. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी वादग्रस्त ठाणेदार प्रमोद मक्केश्वर यांच्या बाबतीत पुढे येत आहेत. 

अनेक संघटना निलंबित करण्याची मागणी करत आहेत. पण जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ठाणेदार यांना वाचविण्यासाठी वैद्यकीय कारण पुढे करून एका सामान्य माणसाच्या अन्यायाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना अपघात झाला व त्यात ते गंभीर जखमी झाले. ते काही दिवस रजेवर होते. पण ते त्या अपघातातून बरे होण्याअगोदर ते ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे रूजू झाले. 

जेव्हा खरंच वैद्यकीय कारण असताना एवढा मोठा तालुक्यांचा प्रभार वादग्रस्त ठाणेदार प्रमोद मक्केश्वर यांना देण्यात आले. हे ब्रम्हपुरी तील जनतेने बघितले आहे. आणि जर दोन व्यक्ती मध्ये वाद होऊन जर एकाद्याला दुखापत झाली तर दुखापत करणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात येते. 


मग येथे का बरं नाही असा प्रश्न ब्रम्हपुरी तालुक्यातील जनतेला पडत आहे. बदली करून जर आरोपी ठाणेदार मकेश्वर यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असेल ते जिल्हा पोलीस प्रशासनाला खरंच योग्य आहे का? असा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न पडतो आहे. पिडीत व्यक्ती चक्रधर जांभुळे यांनी वादग्रस्त ठाणेदार प्रमोद मक्केश्वर यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.