कोरोना सारख्या विश्वसंकटातही माणुसकी जिवंत : रक्तदान महादान निःस्वार्थ सेवा फॉउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन : ग्रामिण भागात सुद्धा रक्तदान सारख्या पवित्र कार्यात नागरिकांचा सहभाग : ४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून फेडले समाजाचे ऋण #blooddonation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना सारख्या विश्वसंकटातही माणुसकी जिवंत : रक्तदान महादान निःस्वार्थ सेवा फॉउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन : ग्रामिण भागात सुद्धा रक्तदान सारख्या पवित्र कार्यात नागरिकांचा सहभाग : ४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून फेडले समाजाचे ऋण #blooddonation

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर कोरपना :कोरपना तालुक्यातील नारंडा येथे रक्तदान महादान निःस्वार्थ सेवा फ़ॉउंडेशन,चंद्रपुर व समस्त ग्रामवासी नारंडा यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
       

या रक्तदान शिबिरात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून यामध्ये नारंडा व नारंडा परिसरातील लोणी,वनोजा,आवाळपूर,शेरज,आसन, पिपरी,काढोली,वनसडी इत्यादी गावातील रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.या रक्तदानाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे ऋण फेडण्याचे प्रयत्न केले आहे.

         
कोरोना सारख्या विश्वसंकटात माणुसकी जिवंत असल्याच्या परिचय या सर्व रक्तदात्यांनी दिला आहे.तसेच या वैश्विक महामारीमध्ये कोणत्याही रुग्णाला रक्ताची कमकरता भासु नये यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.


         
या रक्तदान शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंबे,भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने,वनोजा सरपंच सविताताई पेटकर, नारंडा पोलीस पाटील नरेश परसुटकर,नारंडा उपसरपंच अनिल शेंडे उपस्थित होते व रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सत्यवान चामाटे,प्रवीण हेपट,प्रमोद शेंडे,अजय तिखट,विनोद काथवटे,वैभव गंगमवार,सचिन दवंडे, निखिल गाडगे,अंकुश पावडे,हर्षल चामाटे, मंगेश तिखट,अरुण निरे,मनोज तिखट यांनी परिश्रम घेतले.