शेतकऱ्यांची फिळवणुक थाबवावी..कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सि.सि.आय ग्रेडर महाराष्ट्रात उपलब्ध करून त्वरित कापुस प्रक्रियेला गती द्यावी : मिर्ची व कापूस खरेदीबाबत बाजार समित्यांची कार्यतत्परता अपेक्षित -अँड संजयभाऊ धोटे, माजी आमदार - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकऱ्यांची फिळवणुक थाबवावी..कर्नाटक व आंध्रप्रदेशातील सि.सि.आय ग्रेडर महाराष्ट्रात उपलब्ध करून त्वरित कापुस प्रक्रियेला गती द्यावी : मिर्ची व कापूस खरेदीबाबत बाजार समित्यांची कार्यतत्परता अपेक्षित -अँड संजयभाऊ धोटे, माजी आमदार

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

चंद्रपूर जिल्ह्यातील कापुस विक्री खरेदी व मिरची खरेदी विक्री प्रक्रिया व कृषीउत्पना बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणारे खरेदी विक्री व्यवहार सुरू करणे व राजुरा निर्वाचन क्षेत्रातील पाणी पुरवठा योजणातिल कामे पुर्णत्वास येऊन टंचाई ग्रस्त ग्रामीण भागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याबाबत अँड संजय धोटे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असून थेट केंद्र सरकार कडे महाराष्ट्रातील सि.सि.आय ग्रेडर ची संख्या वाढविण्याची मागणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचेकडे केली आहे.

संदर्भात 13 एप्रिल ला कापूस व मिरची खरेदी संदर्भात माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचेशी चर्चा केली असून कर्नाटक व आंध्रप्रदेशातील खरेदी संपलेली असून तेथील सि.सि.आय ग्रेडर महाराष्ट्रात उपलब्ध करून दिल्यास कापूस खरेदीचा ओघ वाढविता येईल अशी साकारात्मक मागणी सुद्धा महाराष्ट्र सरकार कडे केली होती. त्याअनुषंगाने चालढकल करणाऱ्या बाजार समित्यांनी सुद्धा आपली जबाबदारी उचलून कार्यतत्परता दाखवावी असे अपेक्षित आहे.

कोविड – 19 या संसर्गजण्य विषाणू मुळे निर्माण झालेली महामारी परिस्थितीत केंद्र शासणाने व महाराष्ट्र शासणाने संसर्गरोकण्यासाठी व सामाजिक अंतर राखण्यासाठी संचार बंदी जाहीर केली आहे . तासेच तुर्थ २१ दिवसाकरिता संचारबंदी जहिर केली आहे. त्या मुळे सर्वप्रकारचे व्यवहार थकीत झाले आहे. 
  
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासमोर येणाऱ्या संकटाचा सामाना करित शेती संबंधित अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालास चालना देणे आवश्यक आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात कापूस उत्पादक तथा मिरची उत्पादक शेतकरी भरपूर आहे. सदर मालाची खरेदी विक्री व्यवहार काही अंशी सुरु झाले असले तरीही त्यांची गती मंद आहे. 
 
या संबंधित बाजर मूल्य खरेदी व्यवहार सुरू करणे आवश्यक आहे. शेत माल घरी टाकुन असुन बाजारात विक्रीसाठी येण्यासाठी तथा योग्य स्वरूपात त्याचा विल्हेवाट व्हायला पाहिजे. तसेच सद्यस्थितीत कळमना मिरची बाजारपेठ बंद असुन शेतकऱ्यांना कोरोणा चे पार्श्वभूमीवर बाजारपेठ मध्ये जाण्यास परवानगी नसल्याने दलाच्या माध्यमातून व्यवहार होताना शेतकऱ्यांना नुकसान होणे नाकारता येत नाहीत करिता खरेदी व्यवहार सुरू करावे.

तसेच चालू  मे महिन्यात ग्रामीण भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भासत आहे. पाणी    टंचाईग्रस्त गावाना त्याचा त्रास होतो. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या द्वारे पंतप्रधान खनिज प्रतिष्ठान निधी द्वारा  टंचाई ग्रस्त गावातील पाणी पुरवठा योजणा पुर्वत्व सुरू कराव्या म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता त्या योजनाची कामे सद्यस्थितीत पुर्णत्वास झाली नसल्याने तथा समोर येणाऱ्या पाणी समस्याला तोंड देण्यासाठी आज यावर त्वरित उपाययोजना करण्याचीही मागणी केलेली आहे. 

जेनेकरून ग्रामीण भागातील जनतेला मुलभुत पाणी समस्या होणार नाहीत . आदिवासी नक्षलग्रस्त ग्रामीण भागातील अनेक गावाना पाण्याच्या  बाबतीत  समस्या निर्माण होत असतात तरीही या सर्व बाबतीत निवारण करावे अशी विनंती केली असून  सद्याची परिस्थिती लक्षात घेता कोविड  -19 या संकटाशी संपूर्ण जग लढत आहेत. या लढाईत युवकांची भूमिका खूप मोलाची आहे . 

काही युवक स्वयं स्फ्रुर्तीने या लढाईत खारीचा का होईना आपला श्रम रूपी वाट देत आहे या होतकरू युवकांचा मदतीने पुढील काही काळात मदत होत असेल तर स्वयंसेवक म्हणून जिल्याला मदत  होईल. 

सि.सि.आय च्या खरेदी केंद्राला माजी मंत्री हंसराज अहीर व मा.आमदार अँड संजय  धोटे याची भेट :                    
सि.सि.आय ची कापुस खरेदी चंद्रपूर व यवतमाळ जिल्हाभर व मोठ्या प्रमाणात व्हायला पाहीजे ती अजुन झालेली नाही हजारो शेतकऱ्यांची नोंदनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात झालेली आहे. राजुरा तालुक्यात आठ हजार च्या वर व कोरपाना तालुक्यात साडेसात हजाराच्या वर शेतकऱ्यांची नोंदनी झालेली आहे. खरेदीच्या गाड्यांची संख्या वाढ करणे तसेच खरेदीचा वेळ स. 06.00 ते सायं. 06.00 पर्यंत वाढविने अशा सुचना अहीर व धोटे  यांनी केल्या. 

सर्व जिनींग मालकांचे ऍग्रीमेंट  करून कापुस खरेदी करण्याकरीता बाध्य करावे लागेल. वर्षाणुवर्ष जे शेतकरी ज्या जिनवर माल विकतो त्या जिन मालकांनी अशा संकटाच्या वेळेस शेतकऱ्यांचा कापुस घेण्यास टाळाटाळ करू नये. कोरोना लाॅकडाऊन मुळे शेतकऱ्यांनी घरात खोल्यांमध्ये कापुस भरल्यामुळे त्यांचा विचार झाला पाहीजे. 

समोर शेतीचा हंगाम आहे अशा स्थितीत शासनाचे नियम पाळुन सर्व जिनींग मालकांनी नफ्याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांशी तुमचे असलेले जुने संबंध पाहुन ही खरेदी केलीच पाहीजे टाळु नये ही विनंती करूण एपीएमसी च्या माध्यमातुन होणारी खरेदी व सि.सि.आय ची खरेदी दोन्ही खरेदी सर्वत्र सुरू झाली पाहीजे अशा सुचना अहीर यांनी केल्या.

आता पुन्हा उर्वरीत शेतकऱ्यांची नोंदनी शिल्लक असल्याने नोंदनी सतत सुरू ठेवावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करूण चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कापुस उत्पादकांचे हाल बेहाल होणार नाही याची काळजी घ्यावी. सिएमडी सि.सि.आय या स्वतः विदर्भात दौरा करूण गेल्या आणि खरेदीची त्यांची तयारी अयतांना हजारों शेतकऱ्यांची नोंदनी झाली असल्याने चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जिन मालकांनी पुढाकार घेणे जरूरी आहे, टाळु नये अशी विनंती केली.