भाजयुमो चे ग्राउंड वर्क सांभाळत संघटन साफल्य -ब्रिजभूषनजी पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष,चंद्रपुर#bjym-on-zoom - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भाजयुमो चे ग्राउंड वर्क सांभाळत संघटन साफल्य -ब्रिजभूषनजी पाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष,चंद्रपुर#bjym-on-zoom

Share This
लॉकडाऊन मधेही तळागाळात भाजपा युवा मोर्चा सक्रिय 
◾Zoom वर राज्य ते गाव पातळीवर ग्राउंड रिपोर्ट संवाद 
◾भाजयुमो राज्य कार्यकारणी ची चंद्रपूर आढावा बैठक 
◾पोहोचली थेट गाव पातळीवर 
◾कोणी वाटत होते धान्य किट्स तर कोणी केले रक्तदान.

खबरकट्टा / चंद्रपूर : 11मे 2020-

देशात कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे ठिकठिकाणी अत्यंत समस्यांचा डोंगर उभा असताना भाजयुमो चे पदाधिकारी कार्यकर्ते प्रत्यक्ष ठिकाणी कार्य करत असल्याचा समाधानकारक परिचय आज भाजयुमो महाराष्ट्र राज्य कार्यकारणीतील चंद्रपूर आढावा बैठकीत आला. 

आज दि. 11/05/2020 रोज सोमवारला चंद्रपूर जिल्ह्यातील सेवा कार्याचा आढावा तसेच लॉकडाउन मध्ये युवकांसाठी होणाऱ्या स्पर्धात्मक व संवादात्मक कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव व भाजयुमो चंद्रपूर जिल्हा प्रभारी मा.सोपानजी कनेरकर, भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.बादलजी कुलकर्णी यांच्या नेतृत्वात व चंद्रपुर भाजयुमो जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषनजी पाझारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व भाजयुमो मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी व सोशल मीडिया च्या पदाधिकाऱ्यांशी Zoom व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधण्यात आला.

या संवाद मीटिंग मध्ये भाजयुमो जिल्हा महामंत्री आशीष देवतळे, भाजयुमो जिल्हा महामंत्री महेश देवकते,भाजयुमो सचिव आशीष ताजने,सोशल मीडिया जिल्हा संयोजक राकेश कोंडबत्तुनवार, आशीष चावड़ा, गौरव राजुरकर त्याच बरोबर सर्व मंडळ अध्यक्ष व  जिल्ह्यातील भाजयुमो पदाधिकारी व सोशल मीडिया पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिति होती.

या बैठकीची विशेषतः म्हणजे राज्य पदाधिकारी यात प्रत्यक्ष सहभागी झाले असताना चंद्रपूर जिल्ह्यातील काही पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्यक्ष सेवाकार्य करीत असताना सामील झालेले दिसले. समाजभाव वृत्तीने कार्य करणारे भाजयुमो कार्यकर्ते कुठे रक्तदान तर कुठे धान्य किट्स वाटप, तर कोणी बाहेर जिल्ह्यात ये-जा करण्यास लागणारी मदत करतानाच थेट संवाद मीटिंग मध्ये सामील झाले असल्याचे जिल्हा महामंत्री आशीष देवतळे यांनी सांगितले. 

सोशल डिस्टन्स पाळत तळागाळातील सेवाभाव कार्य करणारा कार्यकर्ता zoom अँप च्या मदतीने यात सहभागी होऊन आपापले ग्राउंड वर्क सुरु ठेवत संघटन साफल्य सांभाळताना बघून सर्वांना एक नवीन प्रेरणात्मक ऊर्जा देणारा संवाद ठरला - ब्रिजभूषनजीपाझारे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष,चंद्रपुर