कोरोना नावाच्या " इव्हेंट " चे मोठं " पॅकेज " : #atmnirbhar-bharat - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोरोना नावाच्या " इव्हेंट " चे मोठं " पॅकेज " : #atmnirbhar-bharat

Share This
खबरकट्टा / विशेष : लेखिका -नम्रता आचार्य ठेमस्कर 

आपल्याला ते मोठं मोठं पॅकेज दिसत नाही हे दिसतं जे खरं आहे, सीतारामन म्हणतात मजुरांची राहायची आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश राज्यांना दिलेले आहेत. त्यासाठी राज्यला १०००० कोटींच पॅकेज दिल आहे. 

जर राज्यांना पैसा मिळाला आणि हे मजूर जर सुखात निवाराकेंद्रात राहत आहेत तर मग घरी जायला स्वतःचा जीव का देत आहेत?? याच उत्तर सीतारामन काकू देतील का?? या मजुरांना दोन महिने धान्य मोफत देण्यात येईल असं त्या म्हणाल्या हे धान्य ते त्यांच्या गावाला पोचल्यावर त्यांना मिळेल, पण ते आपल्या गावाला जिवंत पोचणार आहेत का?? 

एक रेशनकार्ड वर देशात कुठेही रेशन मिळेल हे नक्कीच चांगलं पण त्याला देखील एक वर्षाचा कालावधी लागणार आहे तोपर्यंत यांनी जगायचं कसं?? ज्या मनरेगा ला मोदींनी लोकसभेत शिव्या घातल्या तीच योजना आज या मजूरांना साठी तुम्हाला संजीवनी वाटत आहे.मोदी म्हणाले होते देशातील गरीबाला काँग्रेस ने खड्डे खोदत ठेवलं आहे, तर मग तुम्ही काय करतायत?? दुसरी काही योजना तुमच्याकडे आहे का??  

त्याची रोजी तुम्ही वाढवून दिली २२० रुपये एका दिवसाचे. म्हणजे महिन्याचे ६६०० कस भागणार?? सगळे रोजगार गेलेत मग शहरात मनरेगा आता का नको?? तुम्ही म्हणता जे छोटे ठेलवाले यांना कर्ज मिळणार अस म्हणता?? ते कसं?? त्यांना कोणत्याही गॅरंटी विना कर्ज कोण देणार?? कोणत्याही ठेलेवाल्याला विचारा, कोण लोन देत त्यांना??

 हे मोठे मोठे आकडे जाऊ द्या ३० करोड लोकांना सोडून द्या उरलेले १०० करोड गरीब आहे ज्यांचा वाटा तुमच्या सत्तेत मोठा आहे, त्यांच्या खात्यात आधी जो वादा केला ते १५ लाख टाकून द्या त्यांचं ते बघून घेतील मग.. कर्ज वैगरे नका देऊ १५ लाख द्या जे सांगून तुम्ही सत्ता मिळवली एवढं सोप्प आहे ते..