राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा च्या वतीने सेवा दिनचे आयोजन :रक्तदात्यांचा उतस्पृत प्रतिसाद : #ahilyadevi_holkar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा च्या वतीने सेवा दिनचे आयोजन :रक्तदात्यांचा उतस्पृत प्रतिसाद : #ahilyadevi_holkar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वृत्त 1 : राजुरा -

भारतीय जनता पार्टी च्या , वतीने आज राजुरा विधानसभेतिल राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपीपरी, या चार ही तालुक्यात  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवा दिन भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग उतस्पृत प्रतिसाद देत 100हुन अधिक च्या संख्येने रक्त दान केले.

कोरोना वायरसने संपूर्ण जगाला वेढले असून त्यात आपला देश व राज्य सुद्धा सुटले नाही. यात फार मोठा धक्का आपल्या राज्याला बसला असून यात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला.भारतीय जनता पक्षाचे वतीने राजमाता पुण्यश्र्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सेवा दिन म्हणून रक्तदान शिबीर घेण्याचे आव्हान केले कोरोणा चे पार्श्वभूमीवर केव्हाही रुग्णालयात वा आपल्याला केव्हाही कधीही रक्ताची गरज भासू शकते तेव्हा रक्तदान शिबिराचे आयोजन करावे व सहयोग करावे असे आव्हान केले.

रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली सदर कार्यक्रमात मा. आ. ऍड. संजय यादवराव धोटे याच्या सह भाजपा राजुरा विधानसभा चे सर्व नेते जिल्हापरिषद सभापती , जि.प. सदस्य , प.स. सभापती, प. स. सदस्य, सरपंच , न. प. सदस्य , उपसभापती, नगराध्यक्ष, कार्यकर्ते, महिला व युवावर्ग उपस्थित होते. रक्त दाना नंतर रक्त दात्याना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले व वेळोवेळी गरजुना रक्त दान करत राहण्यास प्रेरित केली.

वृत्त 2 : ब्रम्हपुरी -भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा च्या वतीने ब्रम्हपुरी येथे रक्तदान शिबीर संपन्न

राजमाता अहिल्यबाई होळकर याच्या जयंतीचे औचीत साधून मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे संकल्पनेतून व प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरी तालुका च्या वतीने  दी.३१/५/२०२० विठ्ठल रुख्मिणी सभागृह ब्रम्हपुरी येथे कोरोणा महामारिच्या काळात रक्ताचा साठा कमी होत चाललेला आहे त्या मुळे रक्ताची तुटवता भासू शकतो या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरवात  राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला हार व दिपप्रज्वलन करून झाली  कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.अशोकजी नेते,खासदार चिमुर-गड. लोकसभा क्षेत्र,प्रा.अतुलभाऊ देशकर,माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा,प्रा.प्रकाशजी बगमारे जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा,संजयजी गजपुरे जि. प.सदस्य,तालुका महामंत्री माणिकपाटील थेरकर,प.स.सदस्य प्रकाश ननावरे,नामदेव लांजेवार माजी प.स.उपसभापती.या कार्यक्रमाअंतर्गत २८ रक्त दात्यानी रक्त दान केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, मनोज भूपाल, कोषाधक्ष्य अरविंद नंदूरकर, नगरसेवक सागर आमले, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार,स्वप्नील अलगदेवें, उपाध्यक्ष पवन जैस्वाल,प्रमोद बांगरे, सचीव दत्ता येरावर,अमित कनाके,पंकज माकोडे,अमित रोकडे,साकेत भानारकर,तनय देशकर,ललीत उरकुडे यांनी अथक परिश्रम घेतले.

वृत्त 3 : सिंदेवाही :भारतीय जनता पार्टी सिंदेवाही तालुकातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरतर्फे जिल्ह्यात सेवादिन साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले होते. या सेवादिनाचे औचित्‍य साधुन भारतीय जनता पार्टी सिंदेवाही तालुकाच्या वतीने रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

कोरोना विषाणूच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्वभुमिवर रक्‍तपेढ्यांमध्‍ये रक्‍ताचा तुटवडा भासत आहे. हा तुटवडा भरून निघावा या दृष्‍टीने भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हाच्यावतीने रक्‍तदान शिबीराचे आयोजन करून सेवा दिन पाळण्याचे आव्हान करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत सिंदेवाही शहरातील अनेक इच्छुक रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.

गडचिरोली- चिमूर लोकसभा शेत्राचे खासदार अशोक नेते,जी. प अध्यक्ष नागराज गेडाम,गणवीर सर, हितेश सूचक तालुका अध्यक्ष, आदी मंडळी उपस्थित होते.