धक्कादायक निष्काळजीपणा :शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीत अवैध खत साठा : काळाबाजारीकरिता चक्क शासकीय इमारतीचा आडोसा #agri-fertilizer-at-government-hospital - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक निष्काळजीपणा :शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीत अवैध खत साठा : काळाबाजारीकरिता चक्क शासकीय इमारतीचा आडोसा #agri-fertilizer-at-government-hospital

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : पाटण - 

अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेणगाव  येथे खताचा अवैध साठा आढळला. कृषी केंद्र चालकाने काळाबाजारीकरिता चक्क शासकीय इमारतीचा आडोसा घेतल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आज दिनांक 16 मे ला उघडकीस आली.
    
धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकर्‍यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरीता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहिती मिळताच जिवती तहसीलदारांनी धडक कारवाई करीत खतसाठा ताब्यात घेतला आहे. काळाबाजारी करिता थेट शासकीय इमारतीचा आडोसा घेतल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता व कंत्राटदार एजन्सी यांची नेमकी भुमिका न समजणारी आहे. खतांची कमतरता दाखवून भाववाढीसाठी अवैध साठेबाजी तर करण्यात आली नाही ना? अशी शंका परिसरातील नागरिक व्यक्त करित असून तहसीलदारांच्या कारवाईने कृषी केंद्रचालकांचे धाबे दणाणले असून चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

माझा काहीही संबंध नाही-
-  मेसर्स तिरूपती कन्स्ट्रक्शन.
आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये रासायनिक खत कोणी ठेवले मला याबाबतकुठलीही माहिती नव्हती पत्रकारांनी फोन केल्यावर प्रकरण लक्षात आले साईड इन्चार्ज कडून माहिती घेऊन सदर रासायनिक खताचा साठा तात्काळ हटविण्यास सांगितले आहेत-  मेसर्स तिरूपती कन्स्ट्रक्शन

लॉकडाऊनमुळे बांधकामास भेट दिली नाही -
राजकुमार गेडाम, शाखा अभियंता, जिवती
लाॅकडाऊनमुळे शेणगाव आरोग्य केंद्राचे बांधकाम बंद आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून बांधकामास भेट दिली नाही शासकीय  इमारतीत अवैध रासायनिक खत साठविणे चुकीचे आहेत कंत्राटदार एजन्सीने कोणाच्या परवानगीने इमारत दिली हे बघावे लागेल मी उद्याला शेणगाव येथे जाऊन चौकशी करून कारवाई करणार आहे.


शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असताना सिमेंट बॅग ठेवण्याकरिता मी माझ्या मालकीचे गोदाम कंत्राटदाराच्या विनंतीवरून दिले होते. सध्या माझा कापूस निघत असल्याने माझ्या गोदामात जागा नाही. त्यामुळे खत ठेवण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची कंत्राटदाराला परवानगी मागितली आणि त्यांनी परवानगी दिली. त्यामुळे मी त्या ठिकाणी खत ठेवले.-
 पृथ्वीराज खंडाळे कृषी केंद्र चालक

शेणगाव आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये अवैध रासायनिक खत साठविल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पंचनामा करून खतसाठा सील केला आहे या संबंधाने शिव कृषी केंद्र चालकाला नोटीस बजाविली असून चौकशी करून यात जे कोणी दोषी असतील त्यांचेवर कारवाई होणार आहे शासकीय इमारतीत खतसाठा करणे गैर कायदेशीर आहे 
-प्रशांत बेडसे पाटील, तहसीलदार, जिवती.