वेकोलि कर्मचाऱ्याचा खान परिसरातच अपघातात मृत्यू : आज सकाळची घटना #accident-in-wcl-premises - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वेकोलि कर्मचाऱ्याचा खान परिसरातच अपघातात मृत्यू : आज सकाळची घटना #accident-in-wcl-premises

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर येथील लालपेठ खाणीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा खाण परिसरातच कंपनीच्याच ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला.विनोद शिरभैये वय  59 असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मृतक सकाळी हजरी लावून आपल्या कामावर निघाले होते, ते आपल्या दुचाकीने जात असतांना परिसरात कामानिमित्य निघालेल्या कंपनीचा ट्रक क्रमांक एम.एच.34.ए.4362 च्या मागच्या चाकात दुचाकी आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.येत्या नोव्हेंबर महिन्यात मृतक वेकोलि च्या सेवेतून निवृत्त होणार होते.

ते शहरातील भिवापूर वार्ड परिसरात राहतात. या अपघाताबाबत विविध चर्चा असून अपघात कसा घडला याची चौकशी सध्या शहर पोलीस करीत आहे.अपघातानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

यांच्या अचानक झालेल्या अपघातांची बातमी कळताच भिवापुर वार्डात हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढे नाही तर त्यांच्या पिंपळनेरी ह्या मुळ गावी त्याच्या निधनाची बातमी कळताच गावतही हळहळ व्यक्त केली जात आहे.मन मिळावू स्वभावाने, नेहमी जन सामाण्यात वावरणारे विनोद शिरभैये आज सकाळी झालेल्या अपघाताने सर्वांना सोडून गेल्याने त्याच्या आप्तेष्टामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.