तलाठयास लाच घेताना रंगेहाथ अटक #Acb - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तलाठयास लाच घेताना रंगेहाथ अटक #Acb

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रम्हपुरी- 

खेड मक्ता साजा क्र.4 येथील तलाठी राजेंद्र विठोबाजि अतकरे यास 25 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. हि घटना सोमवारी सकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्या टीमने केली आहे.
                
तक्रारदार हे मौजा ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून तक्रारदार यांचे खेड मक्ता येथील 0.43 हे. आर. जमिनीवर पडलेल्या प्लाटिंग क्षेत्रफळाबाबत आदेशात झालेल्या चुकीकडे लक्ष न देता सातबारे व फेरफार करून देण्याच्या कामाकरिता अतकरे यांनी 30 हजाराची लाच तक्रारदारास मागितली असता तक्रारदार यांना तलाठयास अजिबात लाच देण्याची ईच्या नसल्याने त्यांनी त्यांच्या विरोधात ब्रम्हपुरी येथे तक्रार दिली.
 
प्राप्त तक्रारीवरून सोमवारी केलेल्या  पडताळणी कार्यवाही मध्ये तडजोडीअंती 25 हजार रुपये लाचेची मागणी स्पष्ठ झाल्याने तहसिल कार्यालय ब्रम्हपुरी येथे पंचासमक्ष केलेल्या सापळा कार्यवाहि दरम्यान आरोपी राजेंद्र विठोबाजी अतकरे यांना 25 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

 सदरची कार्यवाही रश्मी नांदेडकर,पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक,ला. प्र वि.नागपूर.राजेश दुद्दलवार,अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि.नागपूर,तसेच पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे,ला. प्र वि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश सुरडकर,पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. चंद्रपूर,नापोकॉ संतोष येलपूलवार,पोकॉ संदेश वाघमारे,नरेश ननावरे,व चालक राहुल ठाकरे यांनी यशस्ची पार पाडली आहे.पुढील तपास कार्य सुरू आहे.