खबरकट्टा / चंद्रपूर : ऊर्जानगर -
चंद्रपूर औष्णीक वीज केंद्र, ऊर्जानगर येथील सहाव्या क्रमांकाच्या संचामध्ये बायलरमधील क्लीकर पडून चार कामगार जखमी झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवार दि.31 मे रोजी सकाळी घडली.
यातील दोघांना चंद्रपुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले तर एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जिल्हा सामान्य रूणालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींमध्ये छोटेलाल कटरे, सचिन येरेकर,संदीप नलावडे,विनोद शेळके यांचासमावेश असून हे चारही कामगार अडोरे चंद्रपूर म कंन्स्ट्रक्शन कंपनीचे कंत्राटी कामगार असल्याचे सूत्रांनी सांगीतले.
गेल्या दोन दिवसापासून सिटीपीएसच्या सहाव्या संचामध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. आज सकाळी उपरोक्त कामगार सहाव्या चा संचाच्या बायलर विभागात काम करीत होते.
अचानक बायलरच्या वरच्या भागावरन क्लीकर पडल्याने कामगार काम करीत असलेल्या जुगाडावरून कामगार तब्बल 9 मिटर उंचीवरून खाली पडले. मात्र सुदैवाने सहाव्या संचाचे काम मेन्टनन्ससाठी बंद असल्याने जिवीतहानी झाली नाही.
जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात मागील वर्षभरापासून अपघातांची मालिका सुरू आहे. हा चौथा ते पाचवा अपधात असावा असे कामगार सांगत आहेत.