72 वर्षीय आजींचे विधायक कार्य : निवृत्ती पेन्शन मधून उपलब्ध करून दिल्यात 50 फेस शिल्ड्स : श्रीमती कविता खंडारे यांची कोरोना वोरीअर्स प्रति कृतज्ञता :डॉ. अविष्कार खंडारे यांच्या कुटुंबाची प्रेरनात्म सामाजिक जाणीव #coronavirus - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

72 वर्षीय आजींचे विधायक कार्य : निवृत्ती पेन्शन मधून उपलब्ध करून दिल्यात 50 फेस शिल्ड्स : श्रीमती कविता खंडारे यांची कोरोना वोरीअर्स प्रति कृतज्ञता :डॉ. अविष्कार खंडारे यांच्या कुटुंबाची प्रेरनात्म सामाजिक जाणीव #coronavirus

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

जगात कोरोन विषाणूने थैमान घातले आहे. अनेक देशात लॉकडाऊन सुरु आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळत घरीच थांबण्याचा सल्ला प्रशासन देत असली तरीही अत्यावश्यक सेवा क्षेत्रात येणारे आपले रक्षणकर्ते पोलीस, वैद्यकीय सेवा देणारे ते स्वच्छता कर्मचारी यांनी कोरोनाच्या संकटकाळात स्वतः च्या प्राणाची पर्वा न करत अहोरात्र सेवा देत आहेत. या कोरोना लढवय्या -वोरीअर्स च्या कार्याला सलाम करावे तितके कमी. 

परंतु, ही अत्यावश्यक सेवा देताना स्वतः च्या प्राणाची बाजी लावणारे वोरीअर्स ना  सामान्य नागरिक म्हणून आपण सुद्धा त्यांच्या प्राणाची प्राथमिक काळजी घेणे आपले सुद्धा आद्य कर्तव्य असल्याच्या जाणिवेतून अनेक सामान्य नागरिकांनी या लढवय्यांकरिता विविध प्रकारे मदत पुरवून जणू उपकारांची परतफेडच केली असल्याचे आपण या संकट काळात अनेकदा बघतोय. 

याचं कृतज्ञ जाणिवेतून चंद्रपूर शहरातील नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अविष्कार खंडारे ( नोडल अधिकारी,कोरोना- चंद्रपूर महानगरपालिका) यांच्या 72 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका  मातोश्री श्रीमती कविता खंडारे यांनी आपल्या दरमहा मिळणाऱ्या पेन्शन मधून कोरोना सोबत लड़ाई करणाऱ्या कोरोना वोरीअर्स करिता 50 फेस शिल्ड उपलब्ध करून दिल्यात. 

आज दिनांक 12 मे रोजी श्रीमती कविता खंडारे व त्यांचे सुपुत्र डॉ. अविष्कार खंडारे यांनी या सर्व 50 फेस शिल्ड चंद्रपूर महानगर पालिकेचे आयुक्त श्री. राजेश मोहिते व   मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. राजूरवार मॅडम यांचेकडे सुपूर्त केल्या आहेत. 

या फेस शिल्ड्स चा कोरोना विषाणु पासुन रक्षण करण्यास मदत होऊन याचा  वापर डॉक्टर्स, वैद्यकीय स्टाफ, नर्सेस तसेच फील्ड वर काम करणाऱ्यांना करता येईल. 

या विधायक कार्यातून श्रीमती कविता खंडारे यांनी आपल्या पेन्शन मधुन लहान पण मौल्यवान असे योगदान देऊन  अधिकाधिक लोकांना पुढे येउन मदत करण्याची प्रेरणा दिली आहे.