बिबी येथील उपसरपंच आशिष देरकर यांना ते वक्तव्य भोवले :बदनामीकारक गुन्हा दाखल :भा.द.वि.संहिता कलम 500 नुसार कारवाई : लहानूबाई कडे राशन कार्ड नाहीच : दैनिक वृत्तपत्रांनी प्रकशित केलेली तिची व्यथा मांडणारी बातमी खरी #Bibismartgram - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिबी येथील उपसरपंच आशिष देरकर यांना ते वक्तव्य भोवले :बदनामीकारक गुन्हा दाखल :भा.द.वि.संहिता कलम 500 नुसार कारवाई : लहानूबाई कडे राशन कार्ड नाहीच : दैनिक वृत्तपत्रांनी प्रकशित केलेली तिची व्यथा मांडणारी बातमी खरी #Bibismartgram

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

बिबी गावात एका महिलेला रेशन मिळाले नसून उपासमार करण्याची वेळ आली या आशयाची बातमी काही दैनिक वृत्तपत्रांत प्रकाशित झाली होती. ही बातमी खोटी असल्याचा दावा उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी केला आणि बातमी देणारे पत्रकार हबीब शेख यांच्यावर अत्यंत असंस्कृत शब्दांत, प्राध्यापकी पेशाला अशोभनीय टिका-टिप्पणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी केली. 

या घटनेने व्यथित झालेल्या हबीब शेख यांनी त्या महिलेसंदर्भात सर्व कागदपत्र व माहिती गोळा करून सदर बातमी खरी असल्याचे लोकांना पटवून दिले. त्यानंतर आपली अकारण उपसरपंच आशिष देरकर यांनी बदनामी केली असल्याचे त्यांनी मांडले. 

सदर महिलेचे बँक स्टेटमेंट, घराचे विजबिल, घराचे फोटो, व्हिडीओज, ऑनलाइन रेशन वेब साईटला त्या महिलेच्या नावावर रेशन कार्ड नसणे अशा अनेक मुद्द्यांवर कागदपत्रांसहित आपण दिलेली बातमी खरी असल्याचे हबीब शेख यांनी मांडले. त्या बातमीने सदर महिलेला प्रशासनाने मदत पोहचवली आहे. 

तर हे सर्व पुरावे सादर करत एका प्रामाणिक पत्रकाराची आशिष देरकर यांनी बदनामी केली असे म्हणत गडचांदूर पोलीस स्टेशनला धाव घेतली अखेर त्या तक्रारीची संपूर्ण चाचपणी केल्यानंतर पोलीसांनी बिबी येथील उपसरपंच देरकर यांचेविरोधातभारतीय दंड विधान संहितेतील कलम 500 अंतर्गत गुन्हा नोंदवीला आहे. 

गडचांदूर पोलीस स्टेशनने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी बिबी येथील रेशन घोळ समोर आला. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्याबाबत बिबी येथिल रेशन दुकानाचा परवाना निलंबित केला आहे. त्यानंतर आशिष देरकर यांनी बिबी येथील इलेक्ट्रॉनिक चॅनेलचे पत्रकार हबीब शेख यांच्याविरोधात सोशल मिडियावर अनेक विधान केले. हे विधान  बदनामी करणारे असल्याने अखेर देरकर यांचेविरोधात एन.सी.आर. दाखल झाला.

पत्रकारितेचे पावित्र्य जपले पाहिजे. मी नेहमी सत्याची बाजू मांडली आणि सक्षमपणे गावातील लोकांच्या समस्येला वाचा फोडली. 'मी'पणाची भावना व झालेली चूक मान्य न करण्याचा असलेला स्वभाव यामुळे माझ्यावर खरी बातमी देऊन देखील जिल्हा स्मार्ट ग्राम उपसरपंच देरकर यांनी विकृतीदर्शक बदनामी केली. अत्यंत नीच शब्दात माझ्यावर वार केल्याने माझे कुटुंबीय , आप्तस्नेही आणि ग्रामस्थ व्यथित झाले. बिबी गावातील लोक माझ्यासोबत उभे राहिले म्हणून एक सर्वसामान्य  शेतकरी आज कायदेशीर लढाई लढत असल्याचे मत हबीब शेख यांनी व्यक्त केले. शेती, माती, संस्कृतीशी आपली नाळ कट्टीबद्ध असून गावाच्या हितासाठी पत्रकारिता करत राहील असेही ते म्हणाले.

तर, गडचांदूर पोलीस स्टेशनने या प्रकरणात आशिष देरकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून आपण तातडीने कायदेशीर न्यायलयमार्फत मानहानी नोटीस त्यांना देऊ असेही हबीब शेख यांनी कळविले.