राजुरा येथील युवतीवर वेकोलि कर्मचाऱ्याचा अतिप्रसंग :बलात्काराची तक्रार दाखल होऊनही 5 दिवसात आरोपीला अटक नाही : 5दिवस लोटूनही पीडितेची वैद्यकीय तपासणी नाही : नेमकं पाणी मुरतंय कुठं? #376 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथील युवतीवर वेकोलि कर्मचाऱ्याचा अतिप्रसंग :बलात्काराची तक्रार दाखल होऊनही 5 दिवसात आरोपीला अटक नाही : 5दिवस लोटूनही पीडितेची वैद्यकीय तपासणी नाही : नेमकं पाणी मुरतंय कुठं? #376

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

दिनांक 13 मे 2020 रोजी राजुरा येथील जवाहर नगर येथील घराशेजारी राहणाऱ्या युवतीवर शेजारच्या युवकाने लग्नाचे आमिष देऊंन वारंवार अतिप्रसंग केल्याची तक्रार अपराध क्रमांक 301/2020, भादंवि 376,325,324,506,504 अंतर्गत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून असून आरोपी प्रतीक दत्ता वैरागडे ला तब्बल 5 दिवस लोटूनही अद्याप अटक करण्यात आली नसून सदर प्रकरणातील आरोपी युवक फरार असल्याचे कळते. 

युवतीच्या बयान कथना नुसार सदर युवक वेकोली मध्ये नोकरीस असून त्याने या युवतीवर अनेक वेळा तिच्या कॉलेज मध्ये जाने, पाठलाग करून तिला लग्नाच्या भूलथापा दिल्या. शहराजवळील एका निर्जन स्थळी सदर युतीवर स्वतःच्या गाडी मध्ये अतिप्रसंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून ह्या कृत्यात वापरण्यात आलेली सफारी गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

ह्या युवतीवर मागील अनेक दिवसापासून आमिष दाखवून वेळोवेळी अतिप्रसंग होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले आहे. हे प्रकरण शहरात चांगलेचचर्चेत असून या प्रकरणात काही स्थानिक माजी नगरसेवक व शेजाऱ्यांनी भूमिका संशयास्पद असल्याचीही चर्चा रंगली असून या मुलीच्या घरी वारंवार अनेक व्यक्ती जाऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पीडितेच्या कुटुंबियांचे म्हणणे असून, कोणत्याही दबावाला व अर्थकारणाला न जुमानता न्यायचा मार्ग अवलंबिण्याचा धीर टीम खबरकट्टा च्या गोमती पाचभाई यांनी भेट  घेऊन दिला असून.  हे प्रकरण दडपण्याचा काही स्थानिककांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा संपूर्ण राजुरा परिसरात आहे.