कापूस खरेदी करिता नवीन यादी 48 तासात तयार होणार ! : शेतकऱ्यांची कोंडी खरंच सुटेल काय? #cci-cotton - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कापूस खरेदी करिता नवीन यादी 48 तासात तयार होणार ! : शेतकऱ्यांची कोंडी खरंच सुटेल काय? #cci-cotton

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा अशी मागणी जोर धरली होती अचानक सोनुर्ली नजीक कापुस खरेदी केन्द्रावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. 

तोडगा काढत अखेर आंदोलन मागे घेतले. आता नविन यादी तयार करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनला यश आले आहे . 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या होत्या त्या फेरतपासणी साठी जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांना निर्देश देवुन गटसचिव, तलाठी, व ग्रामसेवकांचे दहा पथक तयार करुन गावोगावी जावुन शेतकऱ्यांनकडील मालाची तपासणी ला सुरवात करण्यात आली लगेच हा अहवाल तातडीने 48 तासात प्रशासनाने कडे नविन यादी येणार आहे. 

यापुर्वी ची जी यादी होती त्याची काल दिवसभर डीडीआर यांनी तपासणी केली यावेळी मध्ये अचुक यादी तयार व्हावी म्हणून जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी हा निर्णय दिला त्या नुसार आज उद्या संपूर्ण यादी तयार करून ज्या शेतकऱ्यांची टोकन यादीच्या जुन्या यादीत आहे परंतु त्यांच्या कडे कापुस नाही अशा लोकांचे नाव रद्द करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव टोकन यादीत समाविष्ट आहेत व कापुस ही आहे त्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात येणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांने आपले नाव टोकन यादीत नोंदविले नाही व त्यांचे कडे कापुस आहे अशा शेतकऱ्यांचा ही कापुस खरेदी करण्यात येणार आहे. 

अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश कमी होण्यास मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या शेतीचा अखेरचा बोंड खरेदी करण्याचा निर्णय सिसिआय ने घेतला आहे शेतकरी ही या निर्णयाने समाधान आहे खरेदी केन्द्रावर चोक बंदोबस्त पोलिसांचा लावला असुन येवढ्या बंदोबस्तात शेतकऱ्यांना कापुस विक्रीची पाळी येवु नये त्या साठी एक चांगला निर्णय घेवुन शेतकऱ्यांना सुचना केल्या आहेत आणि दोन दिवसात अहवाल आल्यानंतर सुरळीत पणे कापुस खरेदी करण्यात येईल.

यावेळी सहकार क्षेत्राचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्रीधररावजी गोडे, सचिव कवडु देरकर, व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते या मुळे बोगस यादी आपोआप रद्द होणार असुन असुन सर्व शेतकऱ्यांचा कापूस सुरळीत पणे खरेदी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व सिसिआय ने घेतला असल्यामुळे शेतकऱ्यांचा जो वाद व तिळा होता तो सुटणार आहे ज्या शेतकऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारा संदेश येईल त्या शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी जिनिंग वर आणावा असे आवाहन प्रशासना कडुन करण्यात आले आहे.