बिग ब्रेकिंग : 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढले ! #maharastra-lovkdown-till-31-मे - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग : 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढले ! #maharastra-lovkdown-till-31-मे

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात - 

कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय.

दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. आता लॉकडाऊन 4.0 ला सुरवात होणार आहे.
31 मेच्या मध्यरात्रीपर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू असणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.नुकतंच याबबतची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 30 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काल 1 हजार 606 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार 706 वर पोहोचली आहे.