बिग ब्रेकिंग : चंद्रपूरात सापडले 3 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण??? : नांदेड वरून पळून आले चंद्रपुरात सापडले?? - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिग ब्रेकिंग : चंद्रपूरात सापडले 3 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण??? : नांदेड वरून पळून आले चंद्रपुरात सापडले??

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 7 मे 

चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जारी केलेल्या पत्रानुसार या तिन्ही नांदेड हुन आलेल्या नागरिकांना नांदेड पोलीस चमू सोबत चंद्रपूर येथून रवाना करण्यात आले असून कोरोना पॉसिटीव्ह नावांचे कन्फर्ममेशन नाही व नांदेड पोलिसांच्या माहिती नुसार त्यांनीही पळून गेलेले ते संशयित 3 रुग्ण चंद्रपूर हुन नेल्याचे कन्फर्म केले आहे. 

नांदेड शहरातून पळालेले चार कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3 गडचांदूर (अंबुजा नजीक ) चंद्रपूरमध्ये सापडले आहेत.या रुग्णांनी तपासणी वेळी नाव, फोन नंबर, सगळेच खोटे दिल्याने शोधाशोध करताना पोलिसांची दमछाक झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रवासात या रुग्णांनी किती लोकांना संक्रमित केले? या प्रश्नामुळे सर्वांची डोकेदुखी वाढली आहे.

नांदेड जिल्ह्यातील 1 मे 2020 रोजी 20 कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढी नंतर त्यातील 4 रुग्ण गायब झाले होते.पण ते सापडत नव्हते. प्राप्त माहितीनुसार त्यापैकी तिघांना चंद्र्पुर पोलिसांनी पकडले आहे. त्यांना नांदेड येथे नेण्याकरिता पोलिसांचे पथक चंद्रपूरला पोहोचले आहे.

पण ते सापडत नव्हते. प्राप्त माहितीनुसार त्यापैकी तिघांना चंद्र्पुर पोलिसांनी पकडले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नेमके कोणत्या ठिकाणी पकडले हे अजून समोर आले नसून त्यांना चंद्रपूर हुन नेण्यासाठी  नांदेड पोलिसांचे पथक चंद्रपूरला पोहोचले आहे.

नांदेड जिल्ह्यात 1 मे रोजीच्या कोरोना बाधीत अहवालांमध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यासर्वाना एका इमारतीत क्वारंटाईन करण्यात आलॆ होते. तेथून 4 रुग्ण गुपचूप पळून गेले होते. त्यांनी प्रशासनाला आपली नावे खोटी सांगितली होती. सोबतच त्यांनी दिलेला मोबाईल नंबर दुसऱ्याचाच होता. त्यांचा शोध अवघड झालेला होता. 

पळून गेलेल्या 4 जणांवर नांदेड येथील वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांचा शोध सुरू झाला. पण दैव बलवत्तर म्हणतात ना असेच काही घडले. 

पळालेले 3 कोरोना रुग्ण गडचांदूर येथे अंबुजा जवळ चंद्रपूर पोलिसांनी पकडले. त्यांनी नांदेड जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली. नांदेड प्रशासनाने त्या 3 जणांना नांदेडला आणण्यासाठी आपले पथक पाठवले आहे.

तिकडे नांदेड प्रशासनाने सुद्धा चौथा कोरोना रुग्ण ताब्यात घेतलेला आहे. पण सांगत असलेले नाव आणि प्रशासनांकडे नाव यात काहीसा फरक आहे. त्याची जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न सुरु आहे दरम्यान नांदेड ते चंद्रपूर हे अंतर 224 किलोमीटर असताना आणि हा गंभीर प्रकार असताना रस्त्यात असलेल्या तीन जिल्ह्याच्या सीमा वर यांना कोणीच कसे रोखले नाही, हा देखील संशोधनाचा आहे. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. या 7 दिवसाच्या प्रवासात ते किती जणांच्या संपर्कात आले हे शोधणे आता महत्वाचे आहे.