ब्रेकिंग : चंद्रपूर जिल्ह्याचा ग्रीन मधून ऑरेंज मध्ये समावेश : 3 मे नंतर चंद्रपूर जिल्ह्यात लॉक डाऊन संपणार नाही? #chandrapur-district-declared-as-orange-zone - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : चंद्रपूर जिल्ह्याचा ग्रीन मधून ऑरेंज मध्ये समावेश : 3 मे नंतर चंद्रपूर जिल्ह्यात लॉक डाऊन संपणार नाही? #chandrapur-district-declared-as-orange-zone

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्हे रेड झोन मध्ये दाखवले आहेत तर 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये दाखवण्यात आले आहेत तर उर्वरित 6 जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा एक आलेखच केंद्राने प्रत्येक राज्याला पाठवला आहे. दुसऱ्या टप्प्यातील लोक डाऊन 3 मे ला संपत असून तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यांना लाॅकडाऊन मधून शिथीलता देता येईल हे प्रत्येक राज्याला कळविले आहे.


3 मे रोजी लॉकडाऊन लागू करून 40 दिवस पूर्ण होणार आहेत. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण करून त्याची यादी आज (1 मे ) सकाळी प्रसिद्ध केली आहे. 3 मे पासून कोरोना बाधितांची संख्या, डबलिंग रेट आणि चाचण्यांचे प्रमाण याच्या आधारे हे वर्गीकरण करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या नियमात देण्यात येणारी शिथिलता झोन निहाय्य निश्चित करण्यात आली आहे.आज जाहीर केलेल्या यादी मध्ये महराष्ट्रातील 14 जिल्हे रेड झोन मध्ये, 16 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये तर 6 जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोन मध्ये करण्यात आला आहे. रेड, ऑरेंज व ग्रीन झोन क्षेत्रात लॉकडाऊन संदर्भातील नियमावली येत्या 3 मे रोजी घोषित केले जाईल.

झोन निहाय्य जिल्ह्यांचे वर्गीकरण

रेड झोन : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, पालघर, यवतमाळ, धुळे, अकोला आणि जळगाव

ऑरेंज झोन : रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा आणि बीड

ग्रीन झोन : उस्मानाबाद, वाशीम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचीरोली आणि वर्धा.