मूल येथे तब्बल 25लाख 55हजाराची चोर बीटी जप्त :श्री. प्रशांत कासराळे, मूल तालुका कृषी अधिकारी यांची धडक कार्यवाही :30लाखाचा मुद्देमाल जप्त : ट्रक चालकास अटक #mul - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मूल येथे तब्बल 25लाख 55हजाराची चोर बीटी जप्त :श्री. प्रशांत कासराळे, मूल तालुका कृषी अधिकारी यांची धडक कार्यवाही :30लाखाचा मुद्देमाल जप्त : ट्रक चालकास अटक #mul

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : मूल -
मूल कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज 5 मे 2020,  मंगळवारी सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातून  गोंडपिपरीमार्गे बिलासपूर मध्यप्रदेश  येथे चोर बिटी घेवून जाणारा ट्रक  पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडला असून  यात 30 लाखाचा मुद्देमाल  जप्त करण्यात आले. चालकाला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती नुसार गुजरात मधील जिल्हा सानंद येथून क्र. एमएच 32 सीक्यु 9882 मधून चोर बीटीच्या वाहतुकीची गुप्त माहिती  श्री.  प्रशांत कासराळे,  मूल तालुका कृषी अधिकारीयांना मिळाली असता,  सहायक पोलीस निरीक्षक ठवरे यांच्यासह मंडळ अधिकारी दिपतांशु तिजरे, कृषी पर्यवेक्षक तथा मंडळ अधिकारी रविशंकर उईके यांनी बेंबाळ येथे गस्त सुरु केली होती. 

दरम्यान, सदर ट्रक मूल तालुक्यातील बेंबाळ येथे आल्यानंतर अडवून तपासणी करण्यात आली. यामध्ये राघवा तसेच मेघना कंपनीच्या प्रत्येकी 1 हजार बॅग आणि अरूणोदया कंपनीच्या सुमारे दीड हजार चोर बिटीच्या बॅग आढळून आल्या. या बॅग जप्त करण्यात आल्या. चोरबिटीची किंमत 25 लाख 55 हजार रुपये इतकी आहे. आयसर कंपनीचा ट्रक 4 लाख रुपए असा एकूण 29 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी  मूल तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर ट्रक चालक अब्दुल रिशीक रफीक शेख रा. नागपूर याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवी 420,कापूस बी बियाणे अधिनियम 2009,बियाणे नियम 1968,पर्यावरण संरक्षण अधिनियम 186, बियाणे अधिनियम 1966,  बियाणे नियंत्रण आदेश 1983 नुसार  विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.