राजुरा येथे 23.54 लाखांचा दारूसाठा नष्ट : #liquor-destroyed-rajura/ - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा येथे 23.54 लाखांचा दारूसाठा नष्ट : #liquor-destroyed-rajura/

Share This

खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -

राजुरा  पोलिसांनी मागील वर्षभरात विविध 112 कारवाईत केलेला 23 लाख 54 हजार 170 रुपयांचा दारुसाठा राजस्व विभागाच्या परवानगीने नष्ट करण्यात आला.

चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने दारुबंदी केली आहे. मात्र राजुरा तालुक्यात अवैध मार्गाने दारुची विक्री सुरु आहे. त्यामुळे राजुरा पोलिसांनी मागील वर्षभरात विविध प्रकारची मोहिम राबवली. यामध्ये अनेक दारुविक्रेत्यांना अटक केली. गुरुवारी सकाळी मागील वर्षभरात केलेल्या 112 कारवाईतील सर्व दारुसाठा नष्ट केला.

लॉकडाऊनमुळे 100 रुपयाला भेटणारी मोहफुलाची दारु हजार रुपयात विक्री होत असताना ऐवढी मोठी दारु नष्ट केल्याने चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे दारुसाठ नष्ट करताना गुप्तता पाळण्यात आली होती.