चंद्रपूर आय. एम. ए. ची नवीन कार्यकारिणी गठीत : वर्ष 2020-21 :अध्यक्ष म्हणून डॉ. श्री अनिल माडुरवार यांची निवड IMA-chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर आय. एम. ए. ची नवीन कार्यकारिणी गठीत : वर्ष 2020-21 :अध्यक्ष म्हणून डॉ. श्री अनिल माडुरवार यांची निवड IMA-chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : अभिनंदन. 

आय. एम. ए. (इंडियन मेडीकल असोसियशन) वी चंदपूर शाखेची वर्ष 2020-21 करिता कार्यकारिणी गठित करण्यासाठी नुकतीच आय. एम. ए. चंदपूरची सभा घेण्यात आली. ही सभा सध्या कोरोनाचा वाढत असलेला प्रकोप बघता झूम या अॅपच्या माध्यमातून विडीयो कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आली. या झूम सभेस चंदपूर शहरातील जवळजवळ सर्वच डॉक्टर्स उपस्थित होते.

या झूम कार्यक्रमात  सर्व सभासद व डॉक्टरांच्या उपस्थितीत डॉ. श्री अनिल उ. माडुरवार यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी डॉ.श्री अनिल माडूरवार यांचे  स्वागत डॉ. श्री किरण देशपांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. या सभेत जुन्या कार्यकारिणीचे विसर्जन होउन नव्याने सभासदांच्या  संपूर्ण कार्यकारिणीचे ही पुनर्गठण करण्यात आले.

या  सभेत सद्यस्थितीत उदभवलेल्या जागतिक महामारी कोविड 19 वर प्रामुख्याने चर्चा  करण्यात आली. कोविड 19 विषयी तज्ज्ञांचे  मत,  कोविड 19 ची जागतिक स्थिती भारतातील त्याविषयी असलेली भौगोलिक स्थिती वातावरण भारतिय जनतेची रोगप्रतिकार शक्ती वापरात असलेली औषधे व रुग्णांवर औषधांचा होणारा योग्य अयोग्य परिणाम यागहित अनेक शक्याशक्यतेची पडताळणी करित नव्याने गठीत झालेल्या आय एम ए शाखेकडुन काय काय उपाययोजना व मदत करता येईल याची ही चाचपणी केल्या गेली. 

या सभेत आजवर झालेल्या आय एम ए चंदपूर च्या कार्यक्रमांचा छोटेखानी उहापोह करित शाखेकडून भविष्यातील तसेच पुढील कार्यक्रमाची आखणी सुद्धा करण्यात आली.

आय. एम. ए. (इंडियन मेडीकल असोसियशन) चे नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष 
डॉ. श्री अनिल उ. माडुरवार यांचे टीम खबरकट्टा तर्फे हार्दिक अभिनंदन.