कोविड -19 ची मदत देण्याच्या बहाण्याने खात्यातील तीस हजार उडविले.#beware-of-online-fraud - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोविड -19 ची मदत देण्याच्या बहाण्याने खात्यातील तीस हजार उडविले.#beware-of-online-fraud

Share This
◾️कोरपना तालुक्यातील नारंडा येथील घटना ; सावधगिरीची गरज. 

खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

कोविड - 19 अंतर्गत   खात्यात दोन हजार पाचशे रुपये जमा करण्यात आल्याचे सांगून एका खातेदाराच्या खात्यातील तीस हजार रुपयाची रक्कम लंपास केल्याची घटना शनिवारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, नारंडा येथील योगेश भादुजी शेंडे यांचे बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी येथे सेविंग अकाउंट आहे. 

काल दिनांक 16 मे शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांना 6382135048 या क्रमांकावरून मोबाईलवर कॉल आला. त्यावरून तुझ्या खात्यात कोविड -19 अंतर्गत दोन हजार पाचशे रुपये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ती रक्कम तपासून सांगा असे सांगण्यात आले. 

यावरून खातेदारांनी फोन पे वरून रक्कम चेक केली असता हॅकर्स कडून एटीएम कार्ड नंबर विचारून सर्वप्रथम दोन हजार पाचशेची रक्कम खात्यातून लंपास करण्यात आली. त्यानंतर एकेक करून असे आठ वेळा एकूण तीस हजार खात्यातून लंपास करण्यात आले

खात्यातील रक्कम लंपास होत असल्याची माहिती लक्षात येताच शेंडे यांनी तातडीने बँक ऑफ इंडिया शाखा वनसडी गाठून घटनेची कल्पना देऊन लेखी तक्रार दिली. तसेच कोरपना पोलिसात ही तकार देण्यात आली.

त्यानंतर त्यांना ही रक्कम हॅकर्स लंपास केली व त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आले.