17 मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविला - केंद्रीय गृह मंत्रालयाचं पत्रक #lockdown-extended-for-two-more-weeks-in-india - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

17 मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविला - केंद्रीय गृह मंत्रालयाचं पत्रक #lockdown-extended-for-two-more-weeks-in-india

Share This
खबरकट्टा / थोडक्यात ब्रेकिंग :Big Breaking : देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवला, केंद्रीय गृह मंत्रालयाचं पत्रककोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असतील आणि ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे.