मनपा कंत्राटदाराच्या भावाला स्वप्नील काशीकर यांची लोखंडी पात्याने मारहाण :मेंदूजवळ 14 टाके पडल्याने जखमी मरणासुन्न अवस्थेत :307 326, 504, 506, अंतर्गत गुन्हा : राजकीय जिल्हाप्रमुखाच्या वरदहस्ताने आरोपीस तब्बल 3 दिवस उशिरा अटक झाल्याची शहरात चर्चा #halfmurder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मनपा कंत्राटदाराच्या भावाला स्वप्नील काशीकर यांची लोखंडी पात्याने मारहाण :मेंदूजवळ 14 टाके पडल्याने जखमी मरणासुन्न अवस्थेत :307 326, 504, 506, अंतर्गत गुन्हा : राजकीय जिल्हाप्रमुखाच्या वरदहस्ताने आरोपीस तब्बल 3 दिवस उशिरा अटक झाल्याची शहरात चर्चा #halfmurder

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

चंद्रपूर शहरातील आदर्श पेट्रोल पंप पासून ते सिएचएल हॉस्पिटल, मूल रोड तुकूम तेथे महानगर पालिकेच्या रस्ते बांधकाम कंत्राटदाराच्या भावाला स्वप्नील काशीकर व शिवा वझरकर यांनी गुंडगिरीतून पावड्याच्या लोखंडी पात्याने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली असून जखमीला डोक्याला मेंदूजवळ 14 टाके पडले असून, अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. 

परंतु, या गंभीर मारहाण प्रकरणात शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच प्रवेश घेतलेल्या स्वप्नील काशीकर यांना एका राजकीय  जिल्हाप्रमुखाचा वरदहस्त असल्याने तब्बल 3 दिवस अटक करण्यात आली नसल्याचे चर्चेत असून, वाळू माफिया असलेल्या काशीकर ची  सततच्या गुंड्डप्रवृत्ती मुळे भाजप ने हकालपट्टी केल्यावर या राजकीयदृष्ट्या निष्क्रिय,  गुंडप्रवृत्तीच्या आरोपीला  आशीर्वाद देत त्यांच्या अनैतिक कृत्यात साथ देणे हे या चंद्रपूर जिल्हाप्रमुख यांची ठोस वृत्ती बनत चालली आहे असे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. 

या प्रकरणाविषयी तक्रारकर्ते सौरभ सुधिर खांडरे यांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार माझा लहान भाऊ नामे कौस्तुभ सुधिर खांडरे हे सिव्हील कन्ट्रक्टर असुन त्याचे रोडचे बांधकाम गुरुद्वारा समोर समिर गड्डमवार यांचे घरासमोर चालु आहे. बांधकामाला लावलेले सामान अग्रवाल कोचिंग क्लासेस समोरिल खाली जागेत ठेवले होते. 

दिनांक 07/05/2020 रोजी सकाळी 11/30 या दरम्यान मी अग्रवाल कोचिंग क्लासेससमोरिल खाली जागेत व बांधकामाचे निघालेले भरण साठवणुक करुन ठेवले होते व हे भरण माझे लहान भावाचे रस्ते खोदकाम  काम सुरु असुन त्या रस्त्याचा खोदकामात निघाले होते. ते भरण उचल  करण्याचे काम सुरु होते व  तिथे मी उपस्थित होतो तेव्हा तिथे स्वप्निल कासीकर व इतर एक व्यक्ती  हे  येवुन मशीन ऑपरेटर व जेसिबी ऑपरेटर यांना शिवीगाळी करित माल उचलायचा नाही व सदर माल उचलायचा असल्यास आम्हाला 5000/- प्रति ट्रिप प्रमाणे देवुन माल घेवुन जा नाहीतर मालाला हात लावायचा नाही असे धमकावुन काम बंद केले.


त्यानंतर ऑपरेटरला काम सुरु करण्यास सांगितले व सदरचा माल हा आपलाच असुन दुसऱ्या  जागेवर शिफ्ट करायचा आहे असे सांगितले तेव्हा जेसीबी ऑपरेटरनी गाडी लोड करणे सुरु केले तेव्हा स्वप्निल कासीकर व शिवा वझरकर हे जेसीबी ड्रायव्हरला पुन्हा धमकावुन काम बंद केले व तुम्हाला कोण काम चालु करण्यास सांगितले असे म्हणुन ते दोघेही माझेकडे धाव आले.


त्यादोघांनी मला हे माल तुम्हारा नही है हमारा है असे म्हणुन शिवीगाळी करन हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केले त्यांनी मला ढकलुन खाली पाडुन पावड्याचे लोखंडी पातांनी माझे डोक्यावर मारले भी उठण्याचा प्रयत्न करित असताना त्यांनी डाव्या मांडीवर ,पाठीवर, डाव्या हातावर, मानेवर, व परत डोक्यावर दोघांनीही मारले माझे डोक्यातुन खुप रक्त निघाल्याने मी तिथे बेशुद्ध पडलो. 


मला क्रिष्णा हार्डवेअर दुकानाजवळ शुद्ध आली, तिथे मला सुपरवायझर शुभम उरकुडे व सत्यजित सरकार यांनी पाणी पाजले. मला मोटार सायकलवर बसवत असताना " अगर ये एरिया मे आया तेरी गाडी, रेती, गिट्टी या तेरी कार भी आई तो तेरे को और तेरे भाईको जान से मार डालेंगे अशी जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर मला सुपरवायझरनी मला पोलिस स्टेशनला आणले पोलिसांनी मला उपचाराकरिता जिल्हा सार्वजनिक रुग्णालय चंद्रपुर येथे आणले असता डक्टरांनी माझेवर उपचार करुन वार्ड क्र 6 मध्ये केले.


मी दवाखान्यात आल्यानंतर मला माझे गळ्यातील अडिच तोळ्याचा सोन्याचा गोफ व उजव्या हातातील करंगळी जवळच्या बोटातील आठ ग्रंमची अंगठी दिसली नाही माझी गोप व अंगठी मारहाण करतेवेळी तिथेच पडली असावी असे मला मला वाटते तरी स्वप्निल कासीकर व शिवा वझरकर यांचे पासुन माझे जिवाला भिती आहे तरी त्यांचेवर कार्यवाहीस जखमी सौरभ सुधीर खांडरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. 

जखमी सौरभ खांडरे यांना डोक्याला मेंदूजवळ गंभीर दुखापत असून त्यांना 14 टाके मारण्यात आले आहे. दैव बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. दोन दिवस जिल्हा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यावर त्यांना मेंदू वर ताण येऊन सतत उलट्या, चक्कर येणे जाणवू लागल्याने त्यांना कुबेर हॉस्पिटल चंद्रपूर येथे शनिवार दिनांक 9 मे ला दुपारी 3 वाजता शिफ्ट करण्यात आले होते. 


ही गंभीर मारहाण होऊन, सौरभ खांडरे अर्धमरणासुन्न स्तिथीत असूनही आरोपींवर रामनगर पोलीस ठाणे येथे अपराध क्रमांक 417/2020 भादंवी 326, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊनही आरोपी मोकाट फिरत होते. यात एका राजकीय  जिल्हाप्रमुखांची मोठी भूमिका असल्याचे चंद्रपूर शहरातील राजकीय व व्यावसायिक गटात चर्चेत आहे. 


शेवटी आज सौरभ खांडरे यांच्या पत्नीने वारंवार पाठपुरावा करून जखमींचे सर्व वैद्यकीय अहवाल रामनगर पोलीस ठाणे येथे सादर केल्यानंतर दोन्ही मारहाण करणारे आरोपी स्वप्नील काशीकर व दुसरा आरोपी  यांचेवर अतिरिक्त भादंवी 307 कलम काल रात्री  जोडण्यात येऊन आज दिनांक 11 मे ला  अटक करण्यात आली असून एक दिवसाचा पोलीस रिमांड देण्यात आल्याचे रामनगर पोलीस तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.