जिल्हाधिकारी आदेश : 13 मे 2020 -दुकानें सुरु ठेवण्यास सुधारित आदेश :जिवनावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 05.00 वाजेपर्यंत सुरु : संपुर्ण जिल्हयामध्ये दि. 14/05/2020 ते दि.17/05/2020 पर्यंत लागू #collectorchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हाधिकारी आदेश : 13 मे 2020 -दुकानें सुरु ठेवण्यास सुधारित आदेश :जिवनावश्यक वस्तूंची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 05.00 वाजेपर्यंत सुरु : संपुर्ण जिल्हयामध्ये दि. 14/05/2020 ते दि.17/05/2020 पर्यंत लागू #collectorchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : जिल्हाधिकारी आदेशानुसार - 13 मे 2020 : 

जिल्हा दंडाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशान्वये फौजदारी प्रक्रिया संहिता 19731974 चे 2) चे कलम 144 चे अन्वये जिल्हयात दिनांक 11 मे, 2020 पासून ते 17 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन मध्ये सुरु असणाऱ्या आस्थापना बाबत निर्गमित करण्यात आलेले आहे.

याद्वारे सुधारीत वेळ जिवनावश्यक खाद्य पदार्थ, किराणा, दुध, दुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुक, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे, बेकरी, पशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 05.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

परंतु दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथवर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.

तसेच जिवनाश्यक वस्तु विक्री व वितरण इ. आस्थापना/दुकाने या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापना/दुकाने (सदर आदेशामधील प्रतिबंधात्मक बाबीमधील  मध्ये नमुद असलेली आस्थापना/दुकाने सोडून) सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 05.00 या वेळेत सुरु राहतील व रविवार ला सदर दुकाने पूर्णतः बंद राहतील.

परंतु दुकान/आस्थापना समोर आणि फुटपाथ्वर कोणत्याही प्रकारचे साहित्य ठेवता येणार नाही.संदर्भीय आदेशातील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहतील. 

सदरचा आदेश संपुर्ण जिल्हयामध्ये दिनांक 14/05/2020 ते दिनांक 17/05/2020 या कालावधीकरिता लागु राहील.

सदर आदेश चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर चे क्षेत्राकरीता लागू राहणार नाही.

सदरचा आदेश आज दिनांक 13 मे, 2020 रोजी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह वैद्यकीय व महसूल विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज त्यांनी बैठक घेतली. 

त्यानंतर त्यांनी 13 मे रोजी रात्री 12 वाजता पासून 17 मे रोजी पर्यंत फक्त चंद्रपूर शहरात जमावबंदी लागू केली आहे. 4 मे पूर्वी असणारे लॉकडाऊन कायम राहील, असे स्पष्ट केले.

त्यामुळे 14 मे पासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते 2 खुली राहणार आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.