चंद्रपूर ब्रेकिंग : किराणा दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या : आज रात्री 10ची घटना #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : किराणा दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या : आज रात्री 10ची घटना #suicide

Share This
 खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर - थोडक्यात -

बल्लारपूर शहरातील कन्नमवार वॉर्ड येथील किराणा दुकानदार यांनी स्वतः च्या दुकानातच आत्महत्या केल्याची घटना आज 4 मे रात्री 10:30वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून लॉकडाऊन मध्ये शांत असलेल्या शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. 

अधिक माहिती नुसार कन्नमवार वॉर्डातील न्युकाॅलनी रोड वरील प्रजापती किराणा स्टोअर्स चे मालक शिवअवतार प्रजापती वय अंदाजे 47 (रहिवासी वेकोलि परिसर जोकू नाला )यांनी आज रात्री 4/5/2020 ला रात्री 10:15 च्या सुमारास स्वताच्या दुकानात गळफास लाऊन आत्महत्या केली असून त्यांचे फोटो सोशल मीडिया वर वायरल होत आहेत.

वृत्त लिहेस्तव सदर घटना स्थळी बल्लारपुर पोलीस चमू पोहोचली असुन पंचनामा सुरू आहे पुठील तपास बल्लारपुर पोलीस करीत असून मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे.