उमेद चांदा ते बाँदा च्या कर्मचाऱ्यांचे 10 महिन्याचे वेतन थकीत : कोरोना च्या महासंकट काळात कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ #chanda-to-banda - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

उमेद चांदा ते बाँदा च्या कर्मचाऱ्यांचे 10 महिन्याचे वेतन थकीत : कोरोना च्या महासंकट काळात कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ #chanda-to-banda

Share This
◾️ दहा महिन्याचे प्रलंबित वेतन तात्काळ द्या राजू झोडे यांनी केली मागणी
 
खबरकट्टा / चंद्रपूर :   
 

चंद्रपूर जिल्ह्यातील उमेद चांदा ते बाँदा च्या कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षापासून वेतन न मिळाल्यामुळे तसेच कोरोना या महासंकटात आर्थिक परिस्थिती गंभीर झाल्यामुळे संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. करिता संपूर्ण थकित वेतन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी उमेद च्या कर्मचाऱ्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाकडे केली.
     
चंद्रपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर, पोंभूर्णा, कोरपना, भद्रावती, सिंदेवाही, बल्लारपूर, सावली, राजुरा व जिवती या तालुक्यात अभियान व्यवस्थापन कक्ष येथे सी.एल. एम., सी. एफ. एम. सी.ए.म., कृषीसखी, पशुसखी मत्स्यसखी या पदावर मागील तीस महिने मानधन तत्वावर उमेद च्या कर्मचाऱ्यांची निवड झाली असून गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी म्हणून उमेद काम करत आहे. 

शासनाच्या मार्गदर्शकानुसार व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान पशुसखी यांना 7000/- कृषीसखी यांना 5000/- कृषी व्यवस्थापक यांना 10000/-  ची किट मिळत होती. तसेच उपजीविका निधी म्हणून पशुसखी व पशु व्यवस्थापक यांना 35000 निवडीच्या सहा महिने नंतर देय होते. हा निधी मिळाला व त्याचे उत्पन्न सुरू झाले अशी खात्री करून नंतर सहा महिन्यानंतर 20 टक्के मानधन  सुरू करावयाचे होते. हे आम्ही नाही तर शासकीय मार्गदर्शिका सांगते. 

दर महिन्याच्या पाच तारखेला सदर कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला पाहिजे असे स्पष्ट निर्देश शासनाचे आहेत. मात्र मागील एक वर्षापासून संपूर्ण कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यात आले नाही. शासनाचे नियम कागदावर ठेवून सदर कर्मचाऱ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. निधी आलाच नाही म्हणून तुमचे वेतन देऊ शकत नाही असे अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सांगतात. 

वेतना बद्दल विचारले असता तुम्ही काम करा निधी आला तर वेतन दिल्या जाईल असे वारंवार सांगितले जाते. मागील एक वर्षापासून वेतन न झाल्यामुळे व हाताला दुसरे कोणते काम नसल्यामुळे जिल्ह्यातील उमेदच्या कर्मचाऱ्यांची मोठी उपासमार होत असून कुटुंबाची मोठी वाताहत होताना दिसत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना वेतन मागितले असता कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. अशा मोठा कचाट्यात उमेदचे संपूर्ण कर्मचारी सापडलेले असून त्यांना तात्काळ वेतन देऊन त्यांची आर्थिक परिस्थिती दूर करावी  अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
    
जर एका आठवड्यात वेतन जमा झाले नाही ही तर उमेद चे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद समोर अमरण उपोषण करतील असाही इशारा उमेद च्या सर्व कर्मचाऱ्यांनी शासन व प्रशासनाला दिला. निवेदन देऊन मागणी करताना राजूभाऊ झोडे, वीरेंद्र मेश्राम, सोनम जांभुळकर हेमंत साखरकर, कार्तिक गोंनलावार, विकास अाऊतकर, घनश्याम कुमरे कैलास कातकर तथा इतर उमेदवार चे कर्मचारी उपस्थित होते.