नारंडा येथे जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांची प्रा. आ.केंद्रात आढावा बैठककोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरीने काळजी घेण्याचे दिले निर्देश.#zpchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नारंडा येथे जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांची प्रा. आ.केंद्रात आढावा बैठककोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरीने काळजी घेण्याचे दिले निर्देश.#zpchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -


चंद्रपुर जिल्हा परिषदअध्यक्षा सौ. संध्याताई  गुरनुले यांनी कोरपना तालुक्यातील नारंडा प्रा. आ. केंद्राला कोरोणा विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट दिली. आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा केली.

दिवसेंदिवस देशात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती विदारक होत चालली आहे. त्यामुळे याचा फटका जिल्ह्याला बसू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपयोजना आखल्या जात आहेत.

अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची सर्वतोपरी जबाबदारी ही आपली आहे. आपल्या परिसरातील जनता या रोगाच्या प्रसारापासुन दूर रहावी. त्यांना प्राथमिक सुरक्षा व उपचार प्राप्त मिळावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. आणि वेळोवेळी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थितीविषयी आढावा देत रहावे, ज्यामुळे कामात सुसूत्रता येईल आणि या परिस्थितीत आपल्यावतीने उत्तम कार्य पार पडेल. असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना दिले. 

      
तसेच चंद्रपुर जिल्हा परिषद अध्यक्ष यांना जे अधिकार कलम ५४(२) मध्ये आहेत त्याचा वापर करून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी २ लक्ष रु.कोरोनाच्या उपाययोजनेच्या साहित्याकरिता निधी मंजूर केला आहे.तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सुरक्षा साहित्य घेण्यासाठी प्रत्येकी १ लक्ष रु निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात डाँ.स्वप्नील टेम्बे, व डाँ.उमेश कऱ्हाडे हे अतिशय उत्तम प्रकारे काम करीत आहेत.तसेच जिल्हा परिषद मार्फत पंचायत विभागाला सोडीम हॅपोक्लोराइड घेण्यासाठी ५८ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.त्यामध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये फवारणी केली जात आहे.तसेच जनतेंनीसुद्धा आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी केले आहे.
     
याप्रसंगी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. टेंभे, डॉ. काऱ्हाडे, भाजयुमोचे जिल्हा सचिव आशिष ताजने,नारंडा येथील पोलीस पाटील नरेश परसुटकर,सत्यवान चामाटे, अनिल मालेकर,प्रवीण हेपट,अरुण निरे यांसह प्रा. आ. केंद्राचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.