रानडुक्कराच्या हल्ल्यात अंतरगाव (बु) येथील सुरेश मडावी जखमी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आशिष ताजने यांची धडपड #wildattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रानडुक्कराच्या हल्ल्यात अंतरगाव (बु) येथील सुरेश मडावी जखमी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी आशिष ताजने यांची धडपड #wildattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

      
कोरपना तालुक्यातील अंतरगाव (बु) येथील सुरेश ज्योतिराम मडावी अंदाजे वय ४५ वर्ष रानडुक्कराच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले आहे.आज दुपारी ते त्यांचे शेती मालक हेमराज कांबळे यांच्या शेतात काम करण्यासाठी  गेले होते तेव्हा त्यांच्यावर रानडुकराने हल्ला केला व ते गंभीररित्या जखमी झाले त्यानंतर त्यांना चंद्रपुर येथील शासकीय रुग्णालयात समोरील उपचारासाठी भरती करण्यात आले.
    
संदर्भात अंतरगाव येथील बंडू पाटील वडस्कर यांनी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांना माहिती देताच ताजने यांनी वनसडी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बासमवार यांना सदर घटनेबाबत सविस्तर माहिती दिली व त्यांना आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी केली असता सदर व्यक्तीचा वैदयकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासकीय नियमानुसार त्यांना आर्थिक मदत दिली जाईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बासमवार यांनी दिली आहे.


तात्काळ शासकीय स्तरावरून हालचाली होऊन तसेच सदर व्यक्तीला शासकीय मदत मिळवून देण्यास प्रयत्न करून जखमीच्या कुटुंबाला आधार मिळवून देऊ असे भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी सांगितले.