WhatsApp चा मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्डवर बंदी : पहा या विषयी सविस्तर माहिती #whats app - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

WhatsApp चा मोठा निर्णय, मेसेज फॉरवर्डवर बंदी : पहा या विषयी सविस्तर माहिती #whats app

Share This
खबरकट्टा / थोडक्यात :
Whats app : व्हॉट्सअॅपचा युजर्सना झटका :

कोरोना व्हायरसबद्दल अनेक अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने मोठा निर्णय घेतला आहे. आता युजर्सना कोणताही मेसेज केवळ एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करता येणार आहे. याआधी कोणताही मेसेज युजर्सना पाच व्यक्तींना फॉरवर्ड करता येत होता. दरम्यान, व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर ही सुविधा सुरू होणार आहे.  कोरोनाबद्दल फेक बातम्या पसरू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
कोरोना व्हायरसवरून सोशल मीडियावर फेक -FAKE माहिती शेअर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हाट्सअप ने  मॅसेज शेअर करण्यावर मर्यादा घातली आहे 

▪️व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आता कोणताही मेसेज एकदाच फक्त एका युजरला फॉरवर्ड करु शकणार 

▪️ याआधी कोणताही मेसेज एकदाच पाच युजर्सला फॉरवर्ड करण्याची सुविधा देण्यात आली होती. 

▪️मात्र, हे व्हॉट्सअ‍ॅपचे फीचर अपडेट केल्यानंतर अॅक्टिव्ह होणार आहे आणि हि बातमी FAKE नाही - त्यामुळे इतर ग्रुप मध्ये पण नक्की शेअर करा