फावल्या वेळेतील विद्यार्थ्यांपुढील आव्हाने...लेखक:विद्यार्थीमित्र नितीन सेलकर #wardha - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

फावल्या वेळेतील विद्यार्थ्यांपुढील आव्हाने...लेखक:विद्यार्थीमित्र नितीन सेलकर #wardha

Share This
खबरकट्टा / वर्धा : शैक्षणिक -

कोरोनाने देशातच नाहीतर जगात थैमान घातल्याने पार पडणाऱ्या काही परीक्षा लांबणीवर तर काही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहेत मात्र या निर्णयाने विद्यार्थी वर्ग जरी काही वेळेसाठी सुखावला असला तरी मात्र यावर्षी नाहीतर पुढल्या वर्षी तरी परीक्षेला विद्यार्थ्यांना तोंड द्यायचे आहेच ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिउत्साही न होता देशावर येणाऱ्या अशा वेगवेगळ्या संकटाचे अनुभव घेऊन भविष्यात येणाऱ्या संकटासाठी उपाययोजना म्हणून कुठल्या गोष्टी शिकता येतील का व कुठले नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करून विकसित व्हायला पाहिजे यावर जोर द्यायला हवा.विद्यार्थ्यांनो यावर्षी जरी परीक्षा झाली नसली तरी ही तुमच्या,माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील खूप मोठी परीक्षा आहे त्यामुळे देशावर नाही तर जगावर आलेलं हे आव्हाहन आपण स्वीकारून बलाढ्य देशाची निर्मिती करण्यासाठी अधिकाधिक अभ्यास आणि वेगवेगळे अनुभव घेणे गरजेचे आहे.हे राष्ट्र युवा राष्ट्र म्हणून ओरखले जाते आहे.


आजच्या युगात विविध तंत्रज्ञान विकसित असल्याने व आपल्या प्रत्येकाच्या घरी स्मार्ट फोन असल्याने त्यातून काही नवीन शिकायला मिळते का,काही माध्यमावर अनेक अभ्यासविषयी सखोल माहितीचे व्हिडिओ आहेत ते बघून सुद्धा आपण बलाढ्य आणि सुशिक्षित राष्ट्र निर्माण कसे करता येईल हे प्रयत्न करायला पाहिजे व देशावर येणारे आव्हान स्वीकारने हीच सध्याची तुमची आणि माझी जबाबदारी आहे..

लेखक:विद्यार्थीमित्र नितीन सेलकर (अल्लीपुर) मो.नं.7798311136