पिपरी येथील गावातील गोठ्याला आग मोठा अनर्थ टळला #villageonfire - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पिपरी येथील गावातील गोठ्याला आग मोठा अनर्थ टळला #villageonfire

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - 

तालुक्यातील पिपरी येथील गावातील एका गोठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण गोठा जळून खाक झाला. ही घटना आज 29 एप्रिल, बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली.

आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य, शिवार फाटा, कडबा आदी जळून खाक झाला. सदर गोठा किशोर पावडे यांच्या मालकीचा आहे. आगीत संपूर्ण  गोठा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. 

सदर घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पचारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी दिलीप देठे , हरिचंद्र अहिरकर यांनी केला.आग विझवण्यासाठी तीन अग्निशमन वाहन दाखल झाले होते. वृत्त लिही पावेतो आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.