मूल तालुक्यातील कवडपेठ येथे वाघाने हल्ला केल्याने मोह वेचणाऱ्या शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. गुलाब महादेव निकुरे (४५) असे या मृतकाचे नाव आहे.दहेगाव बीट कक्ष क्रमांक ५१७ जवळ शेत शिवारात ही घटना घडली.
लाॅकडाऊन नंतर सर्व रोजगाराची काम बंद झाली. हातात रोजगार नाही अशा परिस्थितीत मोहाचा हंगाम आल्याने गावातील अनेक ग्रामस्थ मोह गोळा करण्याचा रोजगार करीत आहे. या घटनेची माहिती त्याच्यासोबत गेलेल्यांनी गावात दिली.
क्लिक करा : चंद्रपूर ब्रेकिंग : युवकाची जंगलात हत्या?
सामील व्हा : खबरकट्टा च्या whats app ग्रुप मध्ये