ब्रेकिंग चंद्रपूर : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार #tigerattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग चंद्रपूर : पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार #tigerattack

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : थोडक्यात -
चिमूर तालुक्यातील मांसळ -सातारा येथील पांडुरंग गायकवाड यांची पत्नी गंगाबाई गायकवाड  वय  (68 ) मोहफूल वेचण्यास गावशेजारी गेली असता पट्टेदार वाघाने  हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली असून सविस्तर वृत्त काही वेळात....... 

सविस्तर वृत्त  : चिमूर तालुक्यातील सातारा येथील महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज ८ एप्रिल  ला सकाळच्या सुमारास घडली. यमूना गायकवाड अंदाजे वय ५५ वर्ष रा. सातारा ता. चिमूर जि. चंद्रपूर असे वाघाच्या हल्यात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

सातारा हे गाव ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकपाशी लागूनच असल्याने येथिल नागरिक या जंगलात मोह वेचण्यासाठी जात असतात. आज दररोजच्या प्रणाणे सदर महिला हि मोह वेचण्याकरीता जंगलात गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने महिलेवर हल्ला केला त्यात महिलेचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वन विभागाला कळताच वन विभागाचे चमू घटनास्थळी दाखल झाले व मृत महिलेचे शव शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या परिसरात या अगोदर सुध्दा कोलारा येथील इसमाला वाघाने ठार केले होते.