तनसीच्या ठिगावर सापडले वाघाचे पिल्लू : अशक्त पिलाला दिले वानरक्षकांनी जीवनदान #tiger - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तनसीच्या ठिगावर सापडले वाघाचे पिल्लू : अशक्त पिलाला दिले वानरक्षकांनी जीवनदान #tiger

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

मूल तालुक्यातील सुशी येथे शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी 6.35 वाजता अजय शेंडे यांच्या घराजवळील तणसीच्या ढीगाजवळ वाघाचे अंदाजे तीन-साडेतीन महिन्याचे पिल्लू आढळून आले.
 
 
सुशी येथील महेश सातपुते यांनी मूल येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य उमेशसिंह झिरे यांना याबाबत कळविले. त्यानंतर झिरे यांनी विभागीय वनाधिकारी सोनकुसरे व मूल पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गदादे यांना या घटनेची माहीती दिली व वनरक्षक मरस्कोले यांना सोबत घेऊन ते घटनास्थळी रवाना झाले. 

घटनास्थळाची पहाणी करुन सोनकुसरे यांच्या परवानगीने वाघाच्या पिल्ल्याला सुखरुप पकडून व केळझर येथील नर्सरीत नेण्यात आले. त्यानंतर सोनकुसरे व अती शीघ्र कृती दलाचे बडकेलवार, बेग यांनी वाघाच्या पिल्ल्याला चंद्रपूर येथील प्राणी उपचार केंद्रात नेले. यावेळी चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरकर, गदादे, क्षेत्र सहायक मेश्राम, खनके, ढोले, वनरक्षक गुरनुले, घागरगुंडे, मरस्कोले, कावळे उपस्थित होते.