लखमापूर चे पोलीस पाटील समाधान वडस्कर यांची आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

लखमापूर चे पोलीस पाटील समाधान वडस्कर यांची आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

कोरपना तालुक्यातील गडचांदूर पोलिस ठाण्यात अंतर्गत असलेल्या लखमापूर येथील पोलिस पाटील समाधान एकनाथ वडसकर हे शेतात मृत अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.  ही हत्या की आत्महत्या चर्चेस परिसरात पेव फुटले आहे.

सदर घटना आज 18 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली असून असून समाधान हे स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ असल्याने मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांसह मित्रमंडळींनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. 

समाधान यांचे वय अंदाजे 38 असून पत्नी एक मुलगा एक मुलगी आणि वृद्ध वडील असा परिवार आहे.सदर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृत्युचे नेमके कारण अद्यापही कळले नाही.


प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे घटना पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालावरून निदर्शनास आले असून, सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे  गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन बंद असल्यामुळे फाशी लावण्यात आल्याने  मृत्यू झाला स्पष्ट करत मृतदेह परिवाराकडे सुपूर्द करण्यात आला असल्याचे  ठाणेदार गोपाल भारती यांनी सांगितलं असून यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.