वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांची आत्महत्या #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी संचालकांची आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -

वरोरा कृषी उत्पन्न बाजारस मितीचे माजी संचालक व सामाजिक कार्यकर्ते साईनाथ पाटील टोंगे यांनी त्यांच्या मूळ येवती या गावी केळी रोड दरम्यान असलेल्या झाडावर स्वतःला गळफासलावून जीवनयात्रा संपविली.६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता साईनाथ पाटील टोंगे शेताकडे जाऊन येतो म्हणून घरी सांगून गेलेत्यांनी एका रस्त्याच्या कडेला मोटार सायकल ठेऊन रस्त्याच्या आडोशाला झुडपातील एका झाडा लागळफास घेतला. 

ते ५२ वर्षाचे होते,त्यांना दोन मुली,पत्नी,भाऊ अंबादास पाटील टोंगे तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण समजू शकले नाही मात्र त्यांचेवर बँकेचे व खाजगी कर्ज असल्याने मागील काही दिवसापासून विवंचनेत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या निधनाने माढेळी नागरी परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.


येवती येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. खासदार धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत शोकसण्यात आली.यावेळी खासदार धानोरकर यांनी स्व. साईनाथ टोगे यांच्यानिधनाने तिव्र दुखः व्यक्त केले असून एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्त्याला मुकलो अशी शोकसंवेदना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.