रेशन धान्याची चोरी - गावकऱ्यांच्या सतर्कतेने सात क्विंटल धान्य जप्त #seven-quintals-grain-seized- - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रेशन धान्याची चोरी - गावकऱ्यांच्या सतर्कतेने सात क्विंटल धान्य जप्त #seven-quintals-grain-seized-

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -चिमूर : 

देशात लॉकडाऊन असल्याने गरीब नागरिकांना शासनातर्फे मोफत व स्वस्तदरात धान्य देण्यात येत आहे. परंतु स्वस्त धान्य दुकानदार आपल्या हक्काच्या धान्याची अफरातफर करीत असल्याबाबत तक्रार देऊनही अधिकारी लक्ष देत नसल्याचे बघून गावकऱ्यांनी एकमत करीत आपणच आपल्या धान्याचे रक्षक बनत वाहानगाव येथील स्वस्त दुकानातील सात क्विंटल तांदूळ चोरून वाहतूक करणाऱ्या वाहनासह पकडून दिले. गावकरिच रक्षक बनल्याचा प्रसंग सोमवारी सकाळी उजेडात आला.

देशात कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने यावर खबरदारी म्हणून मागील २१ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे गरीब, मजूर वर्गातील नागरिकांचे काम बंद आहेत. त्यामुळे शासनाने दारिद्रय रेषेखालील व अंतोदय गटातील नागरिकांसाठी शासनाने रेशन दुकानात सवलतीच्या दराने व प्रधानमंत्री योजनेतील प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ सरकारी स्वस्त धान्य दुकानातून वितरित केले जात आहे. 

मात्र वाहानगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या निर्देशानुसार धान्य न देता कमी देत असल्याची तक्रार ग्रामपंचायत व काही गावकऱ्यांनी तहसिलदारांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीला गंभीरतेने घेतले नाही व चौकशीचा फार्स केला. दुकानदाराला गरिबांचे धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी संधी दिल्याचा आरोप नागरिकांनी शुक्रवारी केला होता. 

तीन दिवसापूर्वी वाहानगाव येथील नागरिकांनी सरकारी स्वस्त धान्य दूकानदार ग्राहकांची लूट करीत असल्याने चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी तक्रार केली होती. परंतु अधिकाऱ्यांकडून दाद मिळाली नाही . शेवटी झालेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यात येथील उपसरपंच प्रशांत कोल्हे, गावातील सहकारी सुधाकर दडमल, तंमुस अध्यक्ष गजानन गायकवाड, बंडूजी भोयर यांच्या सहकार्याने सावरी या गावामधून माललंपास करून पिकअप वाहनाने भरधाव वेगाने गाडी जात असताना पाठलाग करून चोरीचे धान्य पकडून शेगांव पोलिसांच्या स्वाधीन केले.

सदर घटनेची माहिती चिमूरचे तहसिलदार संजय नागटिळक व शेगावचे ठाणेदार एस. पी. बोरकुटे यांना देण्यात आली असता तहसिलदारांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी तांदळाच्या १४ कट्ट्यांसह गाडी शेगाव पोलीस ठाण्यात जमा करून कारवाही सुरू केली.