राजुरा तालुक्यातील शेकडो प्रलंबित निराधार प्रकरणे निकाली : समितीचे माजी अध्यक्ष सतीश धोटे यांच्या मागणीला यश : तालुक्यातील लाभार्त्यांना दिलासा #sanjay gandhi niradhar yojna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तालुक्यातील शेकडो प्रलंबित निराधार प्रकरणे निकाली : समितीचे माजी अध्यक्ष सतीश धोटे यांच्या मागणीला यश : तालुक्यातील लाभार्त्यांना दिलासा #sanjay gandhi niradhar yojna

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होते.तालुक्यातील अनेक निराधार  गोरगरीब, अंध, अपंग, वृद्ध, विधवा,परितकत्या इत्यादी लाभार्त्यांनी तहसील कार्यलय येथे अर्ज सादर केले होते.परंतु गेले अनेक महिने सदर प्रकरणे मंजूर न करताच प्रलंबित असल्याने लाभार्त्यांना सदर बाबीचा त्रास होत होता.


त्यातील काही लाभार्त्यांनी सदर बाब संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे यांच्या निदर्शनास आणून दिली व या संकटकाळी मदत करण्याची मागणी केली. 
        
सदर प्रकरणाची दखल घेत सतीश धोटे यांनी राजुऱ्याचे तहसीलदार डाँ.रविंद्र होळी यांच्याकडे राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरणे तात्काळ मंजूर करावे अशी मागणी केली त्याअनुषंगाने तहीसलदार डाँ. रविंद्र होळी यांनी सदर संजय गांधी निराधार योजनेतील अनेक प्रलंबित प्रकरणे मंजूर केली आहेत. 
    

त्यामुळे राजुरा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्त्यांना दिलासा मिळाला आहे व त्यांच्याकडून प्रकरणे मंजूर करण्यात आले त्याबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.