ब्रेकिंग : गंभीर अपघातात जगन डंभारे (ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता )यांचा मृत्यू : सहप्रवासी लिपिक ज्ञानेश्वर हेडाऊ गंभीर जखमी #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : गंभीर अपघातात जगन डंभारे (ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता )यांचा मृत्यू : सहप्रवासी लिपिक ज्ञानेश्वर हेडाऊ गंभीर जखमी #roadaccident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर ग्रामीण पाणीपुरवठा शाखा अभियंता (सध्या कार्यरत घुग्गुस )जगन डंभारे (वय 55 वर्ष)यांचा काल रात्री गंभीर अपघातादरम्यान मृत्यू झाला असून सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. 


अधिक माहिती नुसार यापूर्वी चंद्रपूर मुख्यालयी  व सध्या घुग्गुस येथे कार्यरत पाणीपुरवठा शाखा अभियंता जगन डंभारे हे वरोरा येथील पाणी पुरवठा वरिष्ठ लिपिक ज्ञानेश्वर हेडाऊ यांना सोबत घेऊन चंद्रपूर येथून हिंगणघाट येथे जात असताना नंदोरी(जाम जवळील )  महामार्गावरील गतिरोधक रात्री दिसलें नसल्यामुळे वाहन गतिरोधकावरून वीस फूट उडून पलटी झाले.गाडीने उसळी घेतल्याने स्वतः चालक असलेल्या डंभारे यांनी सीट बेल्ट बांधले नसल्यामुळे ते बाहेर फेकल्या गेले व जागेवर त्याचा मृत्यू झाला. तर हेडाऊ हे जख्मी झाले हि घटना दिनांक 4 चे रात्री8.30वाजता दरम्यान झाल्याचे कळते ते घुगुस येथील नवीन पाणी टाकी देखरेख व पाणी पुरवठाचे काम सांभाळत होते. त्याचे परिवारीक वास्तव्य हिंगणघाट येथे असून त्यांचे पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.