स्मार्ट ग्राम बीबी येथे धान्य वाटपात घोळ : राशन कार्ड धारकांनी दाखल केली तक्रार : चौकशीत धक्कादायक तथ्य समोर #rashancard - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्मार्ट ग्राम बीबी येथे धान्य वाटपात घोळ : राशन कार्ड धारकांनी दाखल केली तक्रार : चौकशीत धक्कादायक तथ्य समोर #rashancard

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना - बीबी -


कोरपना तालुक्यातील स्मार्ट ग्राम असलेल्या बीबी बीबी गावात स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्यात आले असले तरीही अनेक लाभार्थ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या मानकापेक्षा दर महिन्यातच कमी धान्य देत असल्याची नागरिकांची तक्रार असून या संकटकाळातही हाच प्रकार सुरु असल्याने गावात सरकारी राशन धान्य दुकान चालकांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. संदर्भात गावकऱ्यांनी कोरपना तहसीलदार व पुठवाठा निरीक्षकांकडे  तक्रार दाखल केली असून काल दिनांक 23 एप्रिल ला पुरवठा विभागाचे पथक बीबी येथे येऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून गेले असता काही धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. धान्य वाटपात घोळ व्यतिरिक्त याच धान्य दुकानातून नजीकच्या नांदा ग्रामपंचायतीचे सदस्य व आरटीआय कार्यकर्ते अभय मुनोत यांनी धान्य कट्टे स्वतः च्या स्कूटर वर टाकून 2-3वेळा तक्रारकर्त्यांच्या डोळ्यादेखत   नेले असल्याचे तक्रारीत म्हटलं आहे त्यामुळे नांदा-बीबी परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणात नाना विविध प्रकारचे घोळ चौकशीत समोर आल्याचे चर्चेत आहे.

बीबी गावकऱ्यांच्या म्हणण्या नुसार यापूर्वी सदर स्वस्त धान्य दुकानातून पारदर्शक पणे स्वस्त धान्याचा पुरवठा करण्यात आल्याचा कांगावा स्मार्ट ग्रामपंचायतीच्या लाऊडस्पीकर मधून करण्यात आला. खुद्द बीबी गावात अनेक लाभार्थी धान्यापासून वंचित असून इतर गावात मोफत किट्स वाटण्यास मुनोत यांना परवानगी का देण्यात आली असा प्रश्न बीबीवासी करीत आहेत. 

सदर स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीत अनेक धक्कादायक तथ्य समोर आले असून आश्चर्यकारक म्हणजे या धान्य दुकानाचे वितरक-पुरवठाधारक असलेल्या महालक्षमी महिला बचत गटाच्या सदस्य या स्वतः स्मार्ट उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांच्या पत्नी गीता हेपट (सौ. स्वाती आशिष देरकर ) व सचिव त्यांच्या मातोश्री सिंधुताई देरकर आहेत.  सदर बचत गटात  त्यांच्याच नात्यातील देरकर परिवारातील आणखी 4ते 5 सदस्य असल्याचे समजते. व मुख्य म्हणजे हा बचत गट प्रा आशिष देरकर ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्यावर सुरु करण्यात आल्याचे गटाच्या रेकॉर्ड वरून समजते.त्याही उपर या महालक्षमी बचत गटामार्फत चालविल्या जाणाऱ्या रास्त धान्य दुकानाच्या वितरण स्व्याप थंब चे अधिकार नांदा ग्राम पंचायतीच्या सदस्य प्रिया राजगडकर यांच्याकडे असून त्याच मागील तीन वर्षांपासून धान्य वितरण करीत आहे व  सरकारी धान्य दुकानाच्या FPS  आय डी मध्ये FPS Device ID- 1703273598 मध्ये डिलर म्हणून गीता विठ्ठलराव हेपट(प्रा. आशिष देरकर यांच्या पत्नी ) तर पहिल्या नॉमिनी (-वारस हकदार /जबाबदार व्यक्ती )म्हणून सिंधूबाई आर देरकर (प्रा. आशिष देरकर यांच्या आई ) व दुसऱ्या नॉमिनी म्हणून प्रिया वि राजगडकर (ग्रामपंचायत सदस्य नांदा ) यांची नावे नोंद आहेत. 

हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून सुशिक्षित असलेल्या उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी विचारपूर्वक स्वतः निवडून आल्यावर कुटुंबातील व्यक्तींचा गट तयार करून, कोणताही लोकप्रतिनिधी पदावर असताना शासकीय कंत्राट किंवा पुरवठा करु शकत नाही याची जान असून सुद्धा जाणीवपूर्वक घोळ केला असल्याचे कालच्या चोकशी पथकाच्या दौऱ्यानंतर पंचक्रोशीत चर्चेत आहे. 

या तिघांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करा -नागरिकांची मागणी 

या सर्व घोळाची संपूर्ण चौकशी करून तात्काळ महालक्ष्मी महिला बचत गटाकडून वितरणाचे अधिकार शिथिल करून,शासनाची फसवणूक, अल्ट्रा टेक कर्मचाऱ्यांच्या नावे खोटे इनकम सर्टिफिकेट दाखवून राशन कार्ड तयार करून त्यांच्या नावाचे धान्य इतरांना वितरित करणे,  स्वतः उपसरपंच पदावर असताना शासकीय लाभ घेणे ही  शासनाची फसवणूक असून, या प्रकरणाशी संबंधित सर्वांवर फोजदारी कार्यवाही करून जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी रोखण्यासाठी असलेला जीवनावश्यक वस्तू कायदा (essential commodities act )नुसार  प्रा. आशिष देरकर, प्रिया राजगडकर व अभय मुनोत यांचे  बीबी व नांदा ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करावे असे  निवेदन लाभ न मिळालेल्या राशन कार्ड धारकांनी प्रशाशनाकडे  दिले आहे. अल्ट्रा टेक कर्मचाऱ्यांना मिळते राशन -खोटी कागदपत्रे जोडून मिळविले राशन कार्ड 

बीबी येथील याच महालक्ष्मी महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानातून अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीत दरमहा 30 ते 40 पगार असलेल्या 20 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे खोटे इनकम सर्टिफिकेट बनवून राशन कार्ड प्राप्त करून दुकानाशी जोडण्यात आले असून यातील बहुतांशी लोक दरमहा धान्य उचलत नसून फक्त खोटे कागदपत्रे सादर करत शासनाची फसवणूक केली असल्याने या सर्व राशन कार्ड धारकांवर सुद्धा फोजदारी कार्यवाही करण्याची मागणी बीबी ग्रामस्थ करीत आहेत.