कोळसा चोरी करताना विद्युत ताराला स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू : कोळसा व्यागन वर मृतदेहाचा अक्षरशः कोळसा :आज सकाळची घटना #railwaypoliceforce - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कोळसा चोरी करताना विद्युत ताराला स्पर्श होऊन युवकाचा मृत्यू : कोळसा व्यागन वर मृतदेहाचा अक्षरशः कोळसा :आज सकाळची घटना #railwaypoliceforce

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : घुग्गुस – शहरातील बँक ऑफ इंडिया परिसरातील नवीन वेकोली कोळसा स्टॉक सायडिंग वर  आज दिनांक 15 एप्रिल सकाळी एक युवक रेल्वे वॅगन मध्ये चढून कोळसा काढत असताना त्याचा स्पर्श हाय व्होल्टेज वीज ताराला झाल्याने, विजेच्या प्रचंड धक्क्याने भाजल्या जाऊन  त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ आहे. 

परिसरातील काही युवक दररोज रात्री व सकाळच्या सुमारास या कोल सायडिंग वर दररोज उभ्या असलेल्या वॅगन मधून कोळसा काढून त्याची काळ्या बाजारात विक्री करतात. आपली उपजीविका भागविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून कोळसा काढण्याची जीवघेनी कसरत आज मात्र ही कसरत युवकांच्या जीवावर बेतली.
काही कोल माफियांनी सुद्धा याप्रकारे दररोज कोळसा काढून बाजारात खुली विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला असून याकरिता बाहेर राज्यातून सुद्धा मजूर आणले जात असल्याची परिसरात चर्चा आहे. सदर अपघात ग्रस्त युवक पूर्णपणे भाजला गेला असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.ही घटना रेल्वे पोलीस विभागाच्या ताडाळी पोस्ट च्या अखत्यारीत येत असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.