ब्रेकिंग : पोलिस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या #PSI SUICIDE NEWS - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : पोलिस उपनिरीक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या #PSI SUICIDE NEWS

Share This
खबरकट्टा / गडचिरोली :थोडक्यात -

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येत असलेल्या सावरगाव येथील पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेल्या एका पोलीस उप निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हालवरने गोळी झाडली असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार या पोलीस उपनिरीक्षक यांचे नाव चंद्रकांत शिंदे असे असून ते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 इ सोलापूर या तुकडीचे असल्याची माहिती मिळाली आहे. 
नागपूर. एसआरपीएफ सोलापूर गट दहा या बटालियन मधील एका पोलिस उपनिरीक्षकाने बुधवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास आपल्या सर्विस रिवाॅल्वरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यातील धानोेरा पोलिस उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलिस मदत केंद्रात घडली. एसआरपीएफची सदर तुकडी मागिल दीड ते दोन महिन्यांपासून सावरगाव येथे कर्तव्यावर आहे. चंद्रकांत शिंदे (वय 45 वर्ष) असे मृतक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून ते सोलापूर जिल्ह्याचे निवासी असल्याची माहिती आहे.

दिवंगत शिंदे हे कित्येक दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कळते. त्यांना मागील 6 ते 7 वर्षांपासून पाठीच्या कण्याचा गंभीर त्रास होता. त्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षली भागात तैनाती झाल्याने सतत ऑपरेशन मोडवर रहावे लागत असल्याने त्यांचा त्रास अधिक वाढत गेला असल्याने शारीरिक व्याधीला कंटाळून निराशेच्या गर्तेत येऊन आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.