युवकांनी दिले चितळाला जिवनदान #pombhurna - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवकांनी दिले चितळाला जिवनदान #pombhurna

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : पोंभुर्णा प्रतिनिधी -


आष्टा येथे लगतच्या जंगलातून गावात शिरलेल्या एका मादी चितळाला गावातील युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून जिवनदान दिले.


तालुक्यातील आष्टा येथे गुरुवारी सांयकाळी 4 वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या जंगलातून चितळ (मादी) गावात आले. चितळाला पाहताच गावातील कुत्री चितळ्याच्या मागे लागले. याची माहीती गावातील युवक मयुर दिवसे, महेश दिवसे, देविदास मोरे, कुणाल कोपावार, रोहीत पावडे, तेजस दिवसे यांना मिळतात यांनी चितळाला वाचविण्याकरीता धाव घेतली. चितळ स्वतःचा जिव वाचविण्याकरीता गावालगत असलेल्या अंधारी नदीमधील पाण्यात शिरले. 


कुत्रेसुध्दा तिच्या पाठोपाठ पाण्यात शिरले. परंतु, युवकांनी जिद्दीने पाण्यात शिरून त्या चितळाला कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप सोडविले. नंतर त्या चितळाला गावात आणले. याची माहीती गावातील सरपंच हरिष ढवस यांना देण्यात आली. लगेच त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे वनरक्षक रामटेके यांनी ताबडतोब आष्टा येथे जावून चितळाला ताब्यात घेतले.

नंतर त्या चितळाला पोंभुर्णा येथील वनविभागाच्या नवीन विश्रामगृहाच्या शेजारी जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनरक्षक शेंडे तसेच सुनील मंकिवार, अमित बोदलकर उपस्थित होते. मादी चितळ ही गरोदर होती. चितळाला जिवनदान दिल्याबद्दल आष्टा येथील युवकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.