मॉर्निंगवॉक करणाऱ्यांची पोलिसांनी घेतली परेड : रस्त्यावर योगा करायला लावला #police-take-action-on-morning-walk-people - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मॉर्निंगवॉक करणाऱ्यांची पोलिसांनी घेतली परेड : रस्त्यावर योगा करायला लावला #police-take-action-on-morning-walk-people

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा प्रतिनिधी -


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. 144 कलम लागू आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत अनेकजण ‘मार्निंगवॉक’ करीत आहेत. सायंकाळी शतपावली करीत आहेत. शनिवारी पहाटे पोलिसांनी ‘मॉर्निकवॉक’ करणार्‍यांची चांगलीच ‘परेड’ घेतली. त्यांना रस्त्यावरच ‘योगा’ करायला लावला. यापुढे संचारबंदी फिरायला आले, तर कारवाई करू असा दमही भरला.


टाळेबंदीत घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग होवू, नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र, त्याउपरही नागरिक घराबाहेर पडतच आहे. वरोडा येथील अशाच काही जणांवर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील उडाण पूल, नागपूर-चंद्रपूर मार्गालगत सकाळी फिरणार्‍यांची आणि व्यायाम करणार्‍यांची संख्या मोठी आहे. या गर्दीवर आळा घालण्याकरिता शनिवारी पहाटे सकाळ पाच वाजतापासून पोलिसांनी त्या भागाकडे आपला मोर्चा वळविला. त्यांना पकङून रस्त्यावरच योगा करायला लावला. आता दिसल्यास कडक कारवाईचा इशारा दिला.


संचारबंदीत शहरातील उडाण पूल, वणी रस्त्याने सकाळी फिरणारे, धावणारे, व्यायाम करणार्‍यांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढली आहे. रत्नमाला चौक ते आनंदवन चौकादरम्यानही पहाटेपासूनच गर्दी होत आहे. रस्त्याकडून जाताना पोलिसांची नजर जाते. त्यामुळे कारवाई होईल, या भीतीने ते ले-आऊटमध्ये गर्दी करीत आहे. 


माढेळी मार्गाकडे असलेले लेआऊटचे रस्ते सकाळी गर्दीने फुलून जात आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या भागांकडे आपला मोर्चा वळविला. शनिवारी पहाटे प्रभारी अधिकारी सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक मडावी, सहायक पोलिस निरीक्षक चावरे, दीपक दुधे, सतीश आपरेटवार, तुकाराम निषाद, लोधी, तराळे यांनी ‘मॉर्निगवॉक’ करणार्‍यांना दम दिला. त्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.
police-take-action-on-morning-walk-people