अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाचा अत्याचार : पास्को अंतर्गत गुन्हा दाखल -आरोपीस तात्काळ अटक #pocso act - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाचा अत्याचार : पास्को अंतर्गत गुन्हा दाखल -आरोपीस तात्काळ अटक #pocso act

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर :घुग्गुस -


घुग्घूस येथून जवळच असलेल्या नकोडा गावात एका 25 वर्षीय नराधम आरोपीने शेजारीच राहत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची मुलीच्या तक्रारीवरून घटना उघडकीस आली आहे. 


याप्रकरणी घुग्घूस पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या घुग्गस,नकोडा एका नराधमाने घराशेजरी राहणार्‍या एका 14 वर्षाच्या मुलीवर लागोपाठ अत्याचार केला. हा प्रकार सतत 5  महिन्यान पासून सुरू होता अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे या मुलीला वडील नसून आई ने दुसरे लग्न केल्याने ही एकटीच आजोबासोबत राहते, या नराधमाने मुलीला वेगवेगळे फूस लावून अत्याचार केला. 

संजय नवले (25) रा. नकोडा असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. आरोपीवर घुग्घुस पोलीसात 376 पास्को 506, 4/12, 452, 354 नुसार गुन्हा केला. आरोपी हा नेहमीच सदर मुलीला त्रास देत होता.

याबाबत स्वतः मुलीनेच घुग्घूस पोलिसात तक्रार दिली.पुढील पोलीस उप निरीक्षक प्राजक्ता नागपूरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.