वर्धा ब्रेकिंग : दगडाने ठेचून इसमाची निर्घृण हत्या #murder - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वर्धा ब्रेकिंग : दगडाने ठेचून इसमाची निर्घृण हत्या #murder

Share This
खबरकट्टा / वर्धा / अल्लीपूर -नितीन सेलकर 

अल्लीपूर येथे इसमाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटनाउघडकीस आली. काल 25 एप्रिल रोजी पहाटेच्यासुमारास ही घटना घडली.

अल्लीपूर येथील हमीद पठाण (वय 36) असेमृतकाचे नाव आहे. अल्लीपूर गावाची आजची पहाट गावात उघडकीस आलेल्या हत्येच्या घटनेने थरार आणणारी ठरली. अल्लीपुरच्या यशवंतशाळेच्या मागच्या परिसरात राहणाऱ्या वसंता आत्राम (वय 42) याच्या घरालगत एका इसमाचा खून झाला असल्याची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक योगेश कामाले,सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बैरागी, जमादार संजय रीठे, संजय वानखेडे, पिंटू पिसे यांनी
घटनास्थळ गाठले. 

त्यावेळी अतिशय क्रूरपणे दगडाने ठेचून एकाची हत्या केली असल्याचेत्यांना निदर्शनास आले. त्यांनी खून झालेला संपूर्ण परिसर तत्काळ सिल करून घेतला. मृतक इसमाची ओळख अल्लीपूर येथील हमीद पठाण
अशी सांगन्यात आली. 

मागील काही वर्षांपासून हमीद पठाण हा अल्लीपूर येथे व्यवसायाकरीता स्थलांतरित झाला होता. मात्र अल्लीपूर गावातत्याचे येणे-जाणे सुरू होते. कालदेखील तो अल्लीपूर येथे आला होता. याप्रकरणी संशयीत म्हणून पोलिसांनी वसंता आत्राम यास ताब्यात घेतले. वसंता आत्राम आणि हमीद पठाण यादोघांचा वाद झाल्यानंतर हमीदची हत्या झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.